कोठडीत आरोपींवर छळ करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना केवळ सरकारी परवानगी असल्याच्या कारणावरून वाचवले जाऊ शकते, या कायद्याच्या तरतुदीवर केरळ उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कौसर एडाप्पागथ यांच्या खंडपीठाने ‘सुधा विरुद्ध केरळ राज्य’ या प्रकरणात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ च्या कलम २१८ नुसार पोलिसाच्या सरकारी संरक्षणाबाबतीत निर्णय नुकताच दिला आहे.
Read More
घटस्फोटित महिला, विधवा, दत्तक मुल घेतलेल्या एकल पालकत्व असणाऱ्या महिलांनाही त्यांच्या प्रमाणपत्रांच्या आधारे मुलांसाठीही ओबीसी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणे शक्य आहे का? याबद्दल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकारचा अर्ज संबधित कार्यालयाकडून अमान्य करणे, हे भारतीय संविधानाचे कलम १४ आणि २१चे उल्लंघन करणारे आहे, अशी याचिका न्यायालयात दाखल झाली होती. या महिलांच्या मुलांना ओबीसी प्रमाणपत्रे वडिलांच्या कागदपत्रांचा आग्रह न धरता प्रमाणपत्रे देता येईल का? यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार दि.२
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, १० जून रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल राज्यातील १ कोटी ३५ लाख आदिवासी बांधवांतर्फे महायुती सरकारचे अभिनंदन. हा स्वतंत्र आयोग म्हणजे आदिवासींच्या जीवनात परिवर्तनाची नांदी आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी शुक्रवार, दि. ६ जून रोजी केले.
कालच महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जमाती (डढ) आयोग’ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगा’च्या धर्तीवर महाराष्ट्रात अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा निर्णय असा हा स्तुत्य निर्णय. महाराष्ट्र सरकार व आदिवासी विकास विभाग मंत्रालयाचे त्यासाठी हार्दिक अभिनंदन व त्यांना जनजातीच्या उन्नतीसाठी उचललेल्या ऐतिहासिक पावलांबद्दल हार्दिक शुभेच्छा.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापन करण्यास तसेच आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवार, दि. ३ जून रोजी सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
ख्रिश्चन धर्म स्वीकारणारी आणि सक्रियपणे त्या धर्माची आचरण करणारी व्यक्ती अनुसूचित जातीचा भाग राहू शकत, असे म्हणत एका पादरीची आंध्र पद्रेश न्यायालयाने कानउघडणी केली आहे. बुधवार, दि. ३० एप्रिल रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९च्या संदर्भात एका खटल्यातील सुनावणीवेळी हा निकाल दिला.
नवी मुंबई : “समाजातील वंचित घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजना अत्यंत महत्त्वाच्या असून त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न करावे,” अशा सूचना ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगा’चे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) धर्मपाल मेश्राम ( Meshram ) यांनी केले.
माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
(Dhangar Community) “धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलली जातील. हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि अन्य कोणत्याही समाजावर अन्याय करणारा नसेल, असे प्रयत्न केले जातील,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी राज्याला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाने गुरुवारी ६ – १ अशा बहुमताने हा निकाल दिला आहे. सरन्यायाधी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. भुषण गवई, न्या. विक्रम नाथ, न्या. बेला एम. त्रिवेदी, न्या. पंकज मिथल आणि न्या. सतिश चंद्र शर्मा यांच्या घटनापीठाने याप्रकरणाचा २००५ सालचा ईव्ही चिन्नया विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य या खटल्यातील निकाल रद्द ठरविला आहे.
कष्टकरी आदिवासी बांधवांच्या लहान मुलींचे आयुष्य शिक्षणाने उजळावे म्हणून वसई पूर्वेतील उसगाव डोंगरीत श्रमजीवी संघटना मुख्यालय असलेल्या पूज्य साने गुरुजी संकुलात फुलबाग या नावाच्या वसतिगृहाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रथमच राष्ट्रीय आयोग तळागाळापर्यत पोहचला आहे. ठाणेकरांच्या दारी आलेल्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग नवी दिल्लीचे सदस्य सुभाष रामनाथ पारधी यांनी शनिवारी (दि.१६ डिसेंबर) विविध योजनांचा आढावा घेत सूचना करून त्याचा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला पाठवण्याचे निर्देश दिले.दरम्यान, ठाणे महापालिकेमार्फत अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, पद भरतीतील आरक्षणाची अंमलबजावणी, अनुकंपा तत्त्वावर होणारी भरती या योजनांच्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले.
सेलू (जिल्हा वर्धा) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती आणि जमाती विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात अपहार करणाऱ्या प्राचार्याला निलंबित करण्याचे आदेश कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवार, दि. ८ डिसेंबर रोजी विधान परिषद सभागृहातून दिले.
नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निवडुकानध्ये तेलंगणा वगळता मध्यप्रदेश, राजस्थान, आणि छत्तीसगड मध्ये वनवासींबरोबरच दलितांनीही भाजपलाच मतदान केले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामधील ९८ अनुसुचीत जाती आरक्षित मतदारसंघांपैकी भाजपने ५७ जागा जिंकल्या, तर कॉंग्रेसने ४० जागा जिंकल्या आहेत. २०१८ मध्ये, भाजपने यापैकी ३२ आणि कॉंग्रेसने ४५ जागा जिंकल्या होत्या.
धर्मांतरित झालेल्या नागरिकांना अनुसूचित जनजाति श्रेणीतून तात्काळ दूर करावे आणि त्यासंदर्भात आवश्यक संविधानिक संशोधन केले जावे, अशी अत्यंत महत्वाची मागणी जनजाति सुरक्षा मंचाने केली आहे.
वनवासी समाजावर गेली ७० वर्ष झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जनजाती सुरक्षा मंच, महाराष्ट्रतर्फे रविवारी भव्य डी-लिस्टिंग महारॅलीचे तथा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत नाशिक, पुणे, नगर तसेच सोलापूर जिल्ह्यातून हजारो जनजाती बांधवांनी सहभागी होऊन, धर्मांतरित वनवासींना अनुसूचित जमातींच्या यादीतून वगळण्याची एकमुखी मागणी केली. महामेळाव्याच्या सुरुवातीला गोल्फ क्लब मैदान येथून भव्य रॅलीचे आयोजन करून शहराच्या विविध भागांतून रॅलीने मार्गस्थ होत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर भव्य महामेळाव्यात त्याचे
भारतीय संविधानाने अनुसूचित जनजातींना दिलेले आरक्षण व त्यांच्यासाठीच्या इतर तरतुदींचा लाभ जनजातीतून धर्मांतरित झालेले लोक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. दुहेरी फायदे उठवत आहेत. आपल्या संस्कृती, परंपरा टिकून राहाव्यात, जनजातींना मिळणार्या सुविधांचे लाभ इतर धर्मीयांनी उठवू नये म्हणून अशा धर्मांतरितांची नावे जनजातींच्या यादीतून काढून टाकावीत (delist) यासाठी प्रयत्न चालू आहेत. या विषयावर उहापोह करणारा हा लेख...
कंत्राटी पद्धतीने ४५ दिवस किंवा त्याहून अधिक काळासाठीच्या सरकारी नियुक्त्यांमध्येदेखील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि ओबीसी प्रवर्गास आरक्षण दिले जाईल, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.
बिहारमध्ये करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी आज जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार बिहारमध्ये सर्वसाधारण श्रेणीतील लोकांची लोकसंख्या १५ टक्के आहे. तर अनूसुचित जाती आणि जमातींची लोकसंख्या २० टक्क्यांहून अधिक आहे. या जनगणनेचा मुख्य हेतू हा ओबीसी समाजाची आकडेवारी गोळा करण्याचा होता.
मणिपूरमध्ये या महिन्याच्या सुरुवातीपासूनच नवा वादंग आणि गृहयुद्धजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यात भर म्हणून आता कुकी आमदार स्वतंत्र राज्य किंवा स्वतंत्र प्रशासकीय प्रदेशाची मागणी करू लागले आहेत. आता अशी आततायी मागणी मैतेई समाजाचे लोक मान्य करणे शक्यच नाही. यानिमित्ताने गेल्या रविवारच्या लेखात आपण मैतेई समाज आणि संस्कृतीची माहिती करुन घेतली होती. आजच्या लेखात कुकी समुदायाविषयी जाणून घेऊया.
मुंबई : अनुसूचित जाती, जमाती,ओबीसी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन खूप सकारात्मक आहे. बार्टी, टीआरटीआय, सारथी आणि महाज्योती या चारही संस्थांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक योजनांमध्ये एकसूत्रता असावी आणि विद्यार्थ्यांना समान लाभ देण्यासाठी या चारही संस्थांनी समन्वय ठेवावा अशा सुचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्या.
आजच्या दिवशी ज्यावेळी मी माझ्या आदिवासी विभागाचा विचार करतो, तेव्हा 2011च्या जनगणनेनुसार, 11.24 कोटी पैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1.05 कोटी इतकी आहे. जवळपास 9.35 टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात असलेले प्रामुख्याने नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, गोंदिया हे जिल्हे आहेत. आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य व केंद्र स्तरावरून विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. त्याविषयी सविस्तर...
‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’ला दि. ८ एप्रिल रोजी आठ वर्षे पूर्ण झाली. २०१४-१५ या आर्थिक वर्षी देशातील बँकांशी बुडित कर्जे फार मोठ्या प्रमाणावर वाढली होती. देशातील स्वयंरोजगार वाढावेत म्हणून केंद्र सरकारने ही महत्त्वपूर्ण योजना अमलात आणली. छोट्या उद्योगांवर मात करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. त्यानिमित्ताने या योजनेच्या यशस्वितेचा आढावा घेणारा हा लेख...
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या मार्च २०२३च्या वाहतूक अहवालात असे नमूद केले आहे की, जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत देशांतर्गत विमानसेवेचा लाभ ३७५.०४ लाख लोकांनी घेतला. याच कालावधीत म्हणजे जानेवारी ते मार्च २०२२ दरम्यान प्रवासी संख्या २४७.२३ लाख होती. हवाई प्रवाशांमध्ये वार्षिक वाढ ५१.७० टक्के आणि मासिक वाढ २१.४१ टक्के नोंदवली गेली आहे.
राज्यातील अनुसुचित जमातीची वर्ग १ ते ४ पर्यंतची विशेष पदभरती प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे बेरोजगार आदिवासी उमेदवारांमध्ये असंतोष पसरलेला आहे. ही पदभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी मागणी वने व सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेली आहे. येत्या एक महिन्यात ही प्रलंबित पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने जाहीरात प्रसिध्द करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
ताईंचे सख्खे बंधू शोभावे, असे संजय राऊत सध्या उपलब्ध नसल्याने दररोज सकाळी रंगणारी ती पत्रकार परिषद लुप्त झाली. त्यात मोठ्या साहेबांचे फेसबुक लाईव्हसुद्धा सातत्याने येत नाही. महाराष्ट्राने कोणाच्या तोंडाकडे पाहावे? काय एकावे? तर रूको जरा.. ताई आहेत ना! उद्धव साहेब, संजय साहेबांपेक्षाही लोकप्रिय विधान करणार्या आपल्या किशोरीताई पेडणेकर. त्या म्हणाल्या, “मुंबईतील शिवसेना भवनात ५०व्या स्वातंत्र्य दिनाला बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले होते. ७५व्या स्वातंत्र्य दिनाला उद्धव ठाकरे यांनी ध्वजारोहण केले
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मंगळवारी झालेल्या सोडतीत प्रस्थापितांचे गड शाबुत राहिले आहेत. कोपरी, वागळे प्रभागात ५० टक्के महिलाना संधी असली तरी उर्वरित ठाण्यात मात्र महिलाराज साठी मैदान मोकळे झाले आहे.
बाबासाहेबांच्या विचार खूप मोठे आहेत आणि त्यांच्या विचारांवरच, त्यांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारेच देश चालला पाहिजे अशा शब्दांत भावना व्यक्त करून मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली
५ डिसेंबर रोजी शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’समोर ‘जय भीम आर्मी’चा उपोषणाचा इशारा
महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे सोमवारी दिल्लीत पोहोचले. त्यांनी अनुसूचित जाती आयोगाकडे (NCSC) पोहोचून त्यांच्या जातीशी संबंधित कागदपत्रे सादर केली. त्यांनी आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांचीही भेट घेतली. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर मुस्लिम असल्याचा आरोप करत जात लपवल्याचे म्हटले होते.
‘लॉकडाऊन’ आणि कोरोना काळामध्ये गरीब, कामगार, रोजंदारीवर काम करणारे व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्या पाठीशी उभे राहत भाजप नगरसेविका उषा मुंडे यांनी आपली माणुसकी जपत अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, औषध वितरणासह व्यापक स्वरुपात मदतकार्य हाती घेतले. त्यांनी केलेल्या व्यापक मदतकार्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. तेव्हा, त्यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांना सलग दुसर्यांदा खासदार म्हणून मतदारांनी लोकसभेत पाठवले आहे. याशिवाय नगरपालिकेमध्ये गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे.
रक्तनात्याचे कुटुंबातील सदस्यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र देण्याचा कायदा पारित करणे, ना. विष्णू सावरा यांच्याकडून आदिवासी विकास विभागचे मंत्रिपद काढून घेण्यात यावे आदी मागण्यांसाठी अॅड. गणेश एन. सोनवणे यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ना. गिरीश महाजन, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. सुरेश भोळे यांना नुकतेच निवेदन दिले.
दरवर्षी हजारो टन बटाटे साठवणुकीच्या सुविधांअभावी सडतात, हे पाहून झारखंडमधील महिला शेतकऱ्यांनी कमी खर्चिक आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडेल, असा बांबूपासून देशी शीतगृहे तयार करण्याचा मार्ग शोधला.
अपिलांच्या कालबद्ध सुनावणीसाठी वनमित्र मोहीम शासनातर्फे सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला