डी-लिस्टिंग महामेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद

धर्मांतरित वनवासींना अनुसूचित जमातींच्या यादीतून वगळण्याची एकमुखी मागणी

    31-Oct-2023
Total Views | 107

d listening

नाशिक :
वनवासी समाजावर गेली ७० वर्ष झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जनजाती सुरक्षा मंच, महाराष्ट्रतर्फे रविवारी भव्य डी-लिस्टिंग महारॅलीचे तथा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत नाशिक, पुणे, नगर तसेच सोलापूर जिल्ह्यातून हजारो जनजाती बांधवांनी सहभागी होऊन, धर्मांतरित वनवासींना अनुसूचित जमातींच्या यादीतून वगळण्याची एकमुखी मागणी केली. महामेळाव्याच्या सुरुवातीला गोल्फ क्लब मैदान येथून भव्य रॅलीचे आयोजन करून शहराच्या विविध भागांतून रॅलीने मार्गस्थ होत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर भव्य महामेळाव्यात त्याचे रूपांतर झाले.

'कोंबडं हरवलं, कंच्या देवाला मानविलं' आणि 'गौराई चाललीव' या व यांसारख्या लोकगीतांवर गोप नृत्य, पावरी (तारपा), फुगडी नृत्य यांसारख्या परंपरागत वनवासी लोकनृत्याच्या सादरीकरणाने जनजाती सुरक्षा मंच, महाराष्ट्रच्यावतीने नशिक येथे गोल्फ क्लब मैदानावर आयोजित डी-लीस्टिंग महामेळाव्याची सुरुवात झाली. प्रसिद्ध वनवासी राजकीय नेते बाबा कार्तिक उंराव यांच्या जयंतीच्या निमित्ताने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या जनजातियांच्या मोर्चाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तारपा नृत्याने मोर्चाची सुरुवात करत गोल्फ क्लब मैदानावरून मोर्चा निघाला आणि त्र्यंबक नाका सिग्नल, अण्णाभाऊ साठे पुतळा, कालिदास कला मंदिर, शिवसेना भवन, सीबीएस सिग्नलवरून त्र्यंबक नाकामार्गे पुन्हा गोल्फ क्लब मैदान येथे त्याचे महामेळाव्यात रूपांतर झाले. डी-लीस्टिंग म्हणजेच धर्मांतरीत व्यक्तींना अनुसूचित जमतींच्या यादीतून वगळण्याच्या मागणीसाठी सगळा वनवासी समज एकत्र आला होता.

मध्य प्रदेश येथील निवृत्त जिल्हा न्यायाधीश तथा जनजाती गौंड नेते प्रकाश उईके यांची प्रमुख वक्ते म्हणून मेळाव्यासाठी उपस्थिती राहिली. जनजाती समाजावर डी-लिस्टिंग कायदा नसल्यामुळे कशाप्रकारे नुकसान होत आहे, याची अत्यंत सूत्रबद्ध मांडणी त्यांनी केली. माऊलीधाम, त्र्यंबकेश्वरचे रघुनाथ महाराज (देवबाप्पा), धर्मधाम आश्रम, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा येथील प. पू. श्री रामणगिरी गुरु यांची विशेष उपस्थिती मेळाव्याला होती.

तसेच, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री, भारती पवार, आयुर्वेदाचार्य संभाजी महाराज पारधी, महंत बाळासाहेब महाराज कोंडार, हभप सहजानंद महाराज (प.पू.दयानंद महाराज यांचे उत्तराधिकारी), देवराम बाबा गाडर, महंत तारामाई बागुल, भागवत देशमुख, काशिनाथ बाबा भोये, हिरामण बाबा घुलूम, श्री. जानुबाबा, बाबासाहेब माळी, दीपक बर्डे यांसह आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत- तुंगार, जनजाती सुरक्षा मंचाचे संयोजक पांडुरंग भांगरे, सहसंयोजक अ‍ॅड. गोरक्षनाथ चौधरी, अ‍ॅड. किरण गबाले हे प्रमुख मान्यवर म्हणून मेळाव्याला उपस्थित होते.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121