आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी वसतिगृह!

    17-Mar-2024
Total Views |
Tribal Girls Education Hostels



खानिवडे :   कष्टकरी आदिवासी बांधवांच्या लहान मुलींचे आयुष्य शिक्षणाने उजळावे म्हणून वसई पूर्वेतील उसगाव डोंगरीत श्रमजीवी संघटना मुख्यालय असलेल्या पूज्य साने गुरुजी संकुलात फुलबाग या नावाच्या वसतिगृहाचा शुभारंभ करण्यात आला. बालपण हरपलेल्या बालमजूर आदिवासी मुलींसाठी विवेक पंडित यांच्या संकलपनेतून या वसतिगृहात मुलींना प्रवेश सुरू झाला आहे . पहिल्याच दिवशी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन या चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले.
 
 
शिकण्याचे, खेळण्या बागडण्यायचे उमलण्याचे वय असलेल्या कातकरी बांधवांच्या चिमुकल्यांचे बालपण कोळसा फोडण्यात, विटा वाहण्यात बालमजुरीत व्यतीत होत आहे. यातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत त्यांचे हरवलेले बालपण परत मिळवून देण्यासाठी उसगाव डोंगरीत मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले असून त्याचा शुभारंभ रविवारी करण्यात आला . चिमुकल्या निरागस कळ्यांची एक बहरलेली फुलबाग असेल असे यावेळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी बोलताना सांगितले. समाजातील संवेनशील दात्यानी पुढे येऊन या उपक्रमाला हातभार लावावा असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.

यावेळी विवेक भाऊ पंडित , ज्येष्ठ पत्रकार संपादक ऍड. सुरेश कामत, शीतल मेडिकेअरचे देवेंद्र पंड्या, ज्येष्ठ समाजसेवक पुष्पत जैन, खोसला इंडस्ट्री चे सूरज खोसला, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, कार्याध्यक्षा ऍड.स्नेहा दुबे-पंडित, सरचिटणीस विजय जाधव, बाळाराम भोईर, सुरेश रेंजड , प्रमोद पवार, सुनील लोणे, गिरीश धामणकर इत्यादी उपस्थित होते.