नवी दिल्ली : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या मार्च २०२३च्या वाहतूक अहवालात असे नमूद केले आहे की, जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत देशांतर्गत विमानसेवेचा लाभ ३७५.०४ लाख लोकांनी घेतला. याच कालावधीत म्हणजे जानेवारी ते मार्च २०२२ दरम्यान प्रवासी संख्या २४७.२३ लाख होती. हवाई प्रवाशांमध्ये वार्षिक वाढ ५१.७० टक्के आणि मासिक वाढ २१.४१ टक्के नोंदवली गेली आहे.
हवाई प्रवास करणार्या प्रवाशांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय घट झाली आहे आणि तक्रारींचे निराकरण करण्यात वाढ झाली आहे.
मार्च २०१९च्या तुलनेत (१६८४ तक्रारी), मार्च २०२३ मध्ये तक्रारी कमी (३४७ तक्रारी) झाल्या आहेत. मार्च २०१९ मध्येे तक्रारींचे निराकरण ९३.५ टक्के झाले. त्या तुलनेत मार्च २०२३ मध्ये ९९ टक्के (अंदाजे) तक्रारींचे निराकरण झाले आहे.
६०.०%, सामान - १६.३%, तिकीट परतावा - ११.८% याप्रमाणे २०१९ मध्ये तक्रारीची प्रमुख कारणे होती, तर मार्च २०२३ साठी उड्डाणाची समस्या - ३८.६%, सामान - २२.२%, तिकीट परतावा - ११.५%, आणि इतर तक्रारी-५% असे प्रमाण नोंदवले गेले आहे.
मार्च २०१९ आणि मार्च २०२३ यांच्यामध्ये तुलना करता, विस्तारा, एअर इंडिया, एअर एशिया आणि स्टार एअरने मार्च २०२३ मध्ये प्रवासी वाढ घटकामध्ये मार्च-२०१९च्या तुलनेत वाढ दर्शविली आहे.तर इंडिगो, स्पाइसजेट आणि गो एअर या विमान सेवांमध्ये घट झाली आहे, असे आढळून आले आहे.
‘शेड्यूल्ड डोमेस्टिक एअरलाइन्स’ चा बाजार हिस्सा
या अहवालात असे नमूद केले आहे की, इंडिगो, विस्तारा आणि एअर एशियाने मार्च २०२३ च्या तुलनेत मार्च-२०१९ मध्ये त्यांच्या बाजार हिश्श्यात वाढ दर्शविली आहे तर एअर इंडिया, स्पाइसजेट, गोएअरने घट दर्शविली आहे.
‘ऑन-टाईम परफॉर्मन्स’ (ओटीपी)
‘शेड्यूल्ड डोमेस्टिक एअरलाईन्स’: बहुतेक एअरलाईन्ससाठी ओटीपी मार्च २०१९ च्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येते. मात्र , इंडिगो आणि एअर इंडियाने त्यांच्या ओटीपी मध्ये सुधारणा केली आहे. चार मेट्रो विमानतळांसाठी देशांतर्गत विमान कंपन्यांच्या ओटीपीची गणना करण्यात आली आहे.