बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना! काय आहे आकडेवारी?

    02-Oct-2023
Total Views |
 caste census
 
पाटना : बिहारमध्ये करण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी आज जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार बिहारमध्ये सर्वसाधारण श्रेणीतील लोकांची लोकसंख्या १५ टक्के आहे. तर अनूसुचित जाती आणि जमातींची लोकसंख्या २० टक्क्यांहून अधिक आहे. या जनगणनेचा मुख्य हेतू हा ओबीसी समाजाची आकडेवारी गोळा करण्याचा होता.
 
या जनगणनेतील आकडेवारीनुसार बिहारमध्ये ६३ टक्के लोकसंख्या ओबीसी समाजाची आहे. बिहारचे मुख्य सचिव आमिर सुभानी यांनी सोमवारी हा अहवाल जारी केला. या अहवालामध्ये बिहार सरकारने एकूण २१४ जातींची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यांच्यामध्ये काही जाती अशा आहेत ज्यांची एकूण लोकसंख्या शंभरपेक्षा कमी आहे. २१४ जातींव्यतिरिक्त इतर जातींचाही अहवालात २१५ व्या क्रमांकावर उल्लेख करण्यात आला आहे.
 
आकडेवारीनुसार बिहार राज्याची लोकसंख्या १३,०७,२५,३१० आहे. सर्वेक्षण केलेल्या कुटुंबांची एकूण संख्या २,८३,४४,१०७ आहे. जनगणनेतील आकडेवारीनुसार बिहारमध्ये ८२ टक्के हिंदू आहेत. तर मुस्लिमांची संख्या १७.७ टक्के इतकी आहे. तर बिहारमध्ये ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन किंवा इतर धर्माच्या अनुयायांची संख्या १ टक्यापेक्षा कमी आहे.
 
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष भारतीय जनता पक्षासह सरकारमध्ये असताना बिहार विधानसभा आणि विधान परिषदेने राज्यात जातनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेसाठी आकडेवारी गोळा करण्याची सुरुवात ७ जानेवारी २०२३ रोजी झाली होती.
 
बिहारमध्ये कोणत्या वर्गाची लोकसंख्या किती?
सामान्य श्रेणी – १५.५२%
मागासवर्ग - २७.१२%
ओबीसी - ३६.१%
अनुसूचित जाती- १९.६५%
अनुसूचित जमाती – १.६८%
 
बिहारमध्ये कोणत्या जातीची लोकसंख्या किती आहे?
यादव – १४.२६%
कुर्मी- २.८७%
तेली - २.८१%
मुसहर- ३.०८%
सोनार-०.६८%
ब्राह्मण- ३.६७%
राजपूत- ३.४५%
भूमिहार- २.८९%
कायस्थ - ०.६०%