उष:काल होता होता..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020
Total Views |

usha mundhe_1  
लॉकडाऊन’ आणि कोरोना काळामध्ये गरीब, कामगार, रोजंदारीवर काम करणारे व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्या पाठीशी उभे राहत भाजप नगरसेविका उषा मुंडे यांनी आपली माणुसकी जपत अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, औषध वितरणासह व्यापक स्वरुपात मदतकार्य हाती घेतले. त्यांनी केलेल्या व्यापक मदतकार्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. तेव्हा, त्यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...

उषा अंकुश मुंढे
राजकीय पक्ष : भाजप
पद : अनुसूचित जमाती प्रदेश उपाध्यक्ष
प्रभाग क्र. : २९, पिंपळे गुरव, नगरसेविका
संपर्क क्र. : ९५५२७३७५४५

‘कोरोना’ नावाचा विषाणू आणि ‘लॉकडाऊन’चा सर्वाधिक फटका बसला तो मजूर, कामगार, गरीब, रोजंदारीवर काम करणारे पुरुष आणि महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना. त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. परिणामी, समाजबांधवांना धीर देण्यासाठी सातत्याने आढावा घेणार्‍या नगरसेविका उषा अंकुश मुंढे यांनी केलेल्या समाजकार्याचा हा परिचय...


usha mundhe_1  
‘लॉकडाऊन’ जाहीर झाले आणि बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांचे, तसेच प्रभागातल्या तृतीयपंथीयांचे जेवणाचे हाल झाले. पण, उषा मुंढे यांनी या सगळ्यांना डबे पोहोचविण्याचे काम आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले. अनेक लोकांचे जेवणाचे हाल होत असताना सर्व कार्यकर्ते मिळून कोणीही उपाशी राहणार नाही, याची खबरदारी घेत होते. प्रत्येकाला अन्न मिळेल याची व्यवस्था करण्यात आली. जवळपास १४ हजार लोकांना अन्नधान्य, रेशन किट विनामूल्य वितरीत करण्यात आले. ज्या लोकांना आवश्यकता होती, त्यांना घरपोच सुविधा देण्यात आली. कोणीही अन्नापासून वंचित राहू नये, याची खबरदारी सर्व कार्यकर्ते मिळून घेत होते. अजूनही मदतीचा हा ओघ सुरुच आहे. नगरसेविका उषा मुंढे यांच्या प्रभागामध्ये सर्वांचे मार्गदर्शक आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मदतीतून १६ लाख लोकांना अन्नदान करण्यात आले. सोसायटीपासून ते अगदी वस्त्यांमधील एकही मनुष्य अन्नापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व कार्यकर्ते मिळून दिवसरात्र काम करत आहेत.प्रभाग व वस्त्यांमधून सॅनिटायझर आणि औषध फवारणी करून प्रत्येक सोसायटीमध्ये, वस्त्यांमध्ये कोरोना रोखण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याविषयी जनजागृती नगरसेविका उषा मुंढे यांनी कार्यकर्त्यांसमवेत केली. ‘आर्सेनिक अल्बम-३०च्या गोळ्या या रोगप्रतिकारक शक्ती वाढवितात. या गोळ्यांचे वाटप घरोघरी करण्यात आले. कोरोना रोखण्यासाठी प्रभागातल्या प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्याला नेमून दिलेली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी व त्याने पूर्ण खबरदारी घ्यावी, यासाठी सातत्याने नगरसेविका उषा मुंढेे स्वतः लक्ष घालत होत्या.



usha mundhe_1  

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करीत राहीन. माझे मार्गदर्शक आमदार लक्ष्मण जगताप मला गुरूस्थानी असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक काम करण्यास मी सक्षम आहे. तळमळीने समाजासाठी काम करण्यासाठी व महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी मी अशीच ठामपणे यापुढेही उभी राहीन.


प्रभागांमध्ये कोरोना रुग्ण सापडला, तर त्यांनी घाबरून न जाता, योग्य ती सोय करून त्यांची पूर्ण खबरदारी घेतली जात होती. कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांचे मानसिक खच्चीकरण होऊ नये व त्यांना आधार मिळावा, त्यांचे सतत मनोबल वाढावे, यासाठी त्यांच्या संपर्कात कार्यकर्ते राहात होते. ज्या ठिकाणी रुग्ण सापडला, त्या-त्या ठिकाणच्या परिसरात लगेच सॅनिटायझर फवारणीही करण्यात आली.नगरसेविका उषा मुंढे यांच्या प्रभागातील ‘प्रतिभा चंद्रगण चॅरिटेबल ट्रस्ट’च्या संयुक्त विद्यमाने महिला बचतगटाने सर्व महिला मिळून कोरोनाकाळामध्ये जेवण बनविण्याचे आणि वाटप करण्याचेही काम अत्यंत खबरदारीने केले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व पिंपरी-चिंचवड शहराचे व आमचे मार्गदर्शक आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामाची आखणी केली. नगसेविका उषा मुंढे यांच्या प्रभागातील असंख्य कार्यकर्ते तसेच महिला, सामान्य नागरिक यांचीदेखील मोलाची साथ कोरोनाकाळामध्ये लाभली. वयोवृद्ध व्यक्तींना घराबाहेर पडण्यास परवानगी नव्हती. तेव्हा, त्यांच्या औषधाची सोय व्हावी यासाठी विशेष यंत्रणा राबविण्यात आली. घरोघरी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही औषधे कशा पोहोचतील, याची व्यवस्था करण्यात आली. ‘लॉकडाऊन’मुळे अनेक विद्यार्थी गावाकडे जाण्यापासून मुकले होते. त्यांचे विशेष पास तयार करून, त्यांना घरी पोहोचविण्याची व्यवस्था मुंढे यांच्यातर्फे करण्यात आली. सफाई कर्मचारी व ज्यांनी ‘कोविड’काळामध्ये काम केले, अशा कोविड योद्ध्यांचा विशेष सत्कार करण्यात आला, जेणेकरून त्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, म्हणून त्यांचे कौतुक करण्यात आले. रिक्षावाले, सफाई कर्मचारी, नागरिक, पोलीस यांना उषा मुंढे यांनी सॅनिटायझर वाटप केले.
याव्यतिरिक्त मुंढे यांनी प्रभागांमध्ये अनेक कामेदेखील केली आहेत. यामध्ये रस्त्याची कामे, ड्रेनेजची कामे, पाणी यंत्रणा यांसारख्या कामांचा समावेश आहे. प्रभागामधल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांचा सत्कार करून विशेष कौतुकही मुंढे यांनी केले. असे अनेकविध कार्यक्रम प्रभागांमध्ये राबविले जातात. अनेक महिलांना उपयोगी पडतील, अशा विविध कार्यक्रमांचे आयोजनदेखील केले जाते. असंख्य कार्यकर्त्यांच्या मदतीशिवाय हे कार्य पूर्णत्वासच गेले नसते, असे त्या म्हणतात.
- सुशील कुलकर्णी
@@AUTHORINFO_V1@@