Order

मुदत संपली! चार दिवसांत ५३७ पाकिस्तानी नागरिकांची घरवापसी, शेकडो भारतीय नागरिकही परतले मायदेशी

(Pahalgam Terror Attack) पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकार अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिलपर्यंत देश सोडून जाण्याचे आदेश दिले होते. या मुदतीचा काल शेवटचा दिवस होता. २३ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत ५३७ पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले आहेत. यामध्ये नऊ सनदी अधिका-यांचा समावेश आहे. याच चार दिवसांच्या काळात ८५० भारतीय नागरिक पाकिस्ता

Read More

मानवी तस्करी करणाऱ्या दोन बांगलादेशी चोरांना अटक, दागिने, हिरे आणि चांदीसाठी १० वेळा सीमा ओलांडली

Bangladeshi Thieve arrested छत्तीसगडच्या महासमुंद पोलिसांनी बांगलादेशी चोरी करणाऱ्यांना दोन चोरांना अटक केली आहे. शिवाय एका मानवी तस्कर आणि आणखी एका सोनारालाही अटक करण्यात आली आहे, चोरट्यांच्या टोळीतील असणारे चोर बांगलादेशी रहिवासी आहेत. तर उर्वरित दोन आरोपी प. बंगालचे रहिवासी आहेत. आरोपीने महासमुंद जिल्ह्यात नऊ वेळा चोऱ्या केल्या होत्या. यासाठी त्याने १० वेळा बांगलादेश-भारत सीमा ओलांडली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ५८ लाख ५२ रुपयांचे हिरे, सोने आणि चांदीचे दागिने, ७ हजार रुपये रोख रक्कम आणि एक दुचाकी जप्त

Read More

महाराष्ट्र शासनाच्या बार्जमधून गुजरातच्या बिबट्यांची राज्यात विनापरवाना 'एण्ट्री'; चौकशीतून गंभीर बाबी समोर

गुजरात राज्यातील जेरंबद बिबटे नर्मदा नदीमधून बार्जद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये सोडत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार दि. १८ जानेवारी रोजी स्थांनिकांनी समोर आणला होता (gujarat releasing leopards in maharashtra border). नंदुरबार वन विभागाने या प्रकरणाच्या केलेल्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे (gujarat releasing leopards in maharashtra border). महाराष्ट्र सरकारच्या सरदार सरोवर प्रकल्पातील बार्जचा वापर करुन गुजरातचे वनकर्मचारी महाराष्ट्रात बिबटे सोडत असल्याचे उघड झाले आह

Read More

"प्रशिक्षक आणि खेळाडूंमधील..."; ड्रेसिंग रूमच्या वादावर प्रशिक्षक गौतम गंभीरने सोडले मौन

(Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळेच सिडनीमध्ये होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी मेलबर्न येथील पराभवाचे पडसाद भारतीय ड्रेसिंग रुममध्ये उमटल्याच्या चर्चा होत्या. मेलबर्न पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने भारतीय खेळाडूंना फटकारल्याचे वृत्त माध्यमांमधून समोर येत होते. परंतु गंभीरने ड्रेसिंग रुममधील या

Read More

रोहित शर्मा करणार निवृत्तीची घोषणा? सत्य काय?

(Rohit Sharma) मेलबर्न कसोटी सामन्यातील भारताच्या पराभवानंतर आता क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर रोहित शर्माच्या निवृत्तीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता सिडनीमध्ये खेळला जाणारा पाचव्या कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असल्याचे बोलले जात आ

Read More

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद चिघळणार? कर्नाटकात इंडी आघाडी सरकारकडून मराठी भाषिकांची गळचेपी!

(Maharashtra-Karnataka Border Dispute) महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे. सध्या बेळगावात सुरु असलेल्या घडामोडींमुळे सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केलेले असताना कर्नाटक सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारत संबंधित परिसरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांनाही राज्यात प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची ही गळचेपी असल्याचा आरोप मराठी एकीकरण

Read More

काश्मीरमधील वाढते दहशतवादी हल्ले : विश्लेषण आणि उपाययोजना

भारत सरकारने ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’चे सर्वोच्च अधिकारी ‘डायरेक्ट जनरल बीएसएफ’ आणि त्यांचे ‘सेकंड इन कमांड’ यांना त्यांच्या पदावरून नुकतेच हटविले आहे. असे इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडले आणि याचे मुख्य कारण आहे की काश्मीर सीमेवर तैनात असलेल्या ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’ना पाकिस्तानकडून होत असलेली दहशतवाद्यांची घुसखोरी थांबवण्यामध्ये आलेले अपयश. त्यामुळे जम्मू-उधमपूर भागामध्ये दहशतवाद्यांचा हिंसाचार हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. याची कारणमीमांसा आणि उपाययोजना यांचा उहापोह करणारा हा लेख...

Read More

नेपाळ सीमेवर १०८ मदरसे, आखाती देशांतून आले १५० कोटी रुपये! एसआयटीचा तपास सुरू

नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील 108 मदरशांमध्ये विदेशी निधीचा पुरावा सापडला आहे. शिक्षणाच्या नावाखाली या मदरशांना आखाती देशांकडून सुमारे 150 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे उघड झाले आहे. हा पैसा कुठे खर्च झाला याचा तपास उत्तर प्रदेश एसआयटी करत आहे. यूपी सरकारने मदरशांना दिल्या जाणाऱ्या निधीची चौकशी करण्यासाठी एडीजी मोहित अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय एसआयटी स्थापन केली. अहवालानुसार, एसआयटीच्या तपासात 108 मदरशांना परदेशी निधी दिल्याचे पुरावे मिळाले आहेत. या मदरशांकडून त्यांच्या बँक

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121