भारतीयांना पाकिस्तानात जायचंय! बॉर्डरवर आक्रोश

    28-Apr-2025
Total Views | 47

भारतीयांना पाकिस्तानात जायचंय! बॉर्डरवर आक्रोश
अमृतसर: अट्टारी बॉर्डरवरून एक धक्कादायक घटना समोर आली. एका भारतीय महिलेने बॉर्डरवरच स्वतःला विष पिऊन संपवण्याची धमकी दिली. "माझे लग्न पाकिस्तानमध्ये झाले आहे. आम्ही मोठी रक्कम खर्च करून इथे कुटुंबियांना भेटायला आलो आहोत. माझे पती आणि मुले ह्यांना बॉर्डरपार करून पाकिस्तानात जाऊ दिले, मग मलाच का थांबवले?" असा सवाल तीने केला.
महिलेने स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर तिला पाकिस्तानात जाण्यास परवानगी दिली नाही, तर ती टोकाचं पाऊल उचलेल. या प्रकारामुळे सीमारेषेवर एकच खळबळ उसळली. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
तसेच, दुसऱ्या एका भारतीय महिलेनेही बॉर्डरवरील अधिकाऱ्यांना विनंती करत सांगितले की, "कृपया आम्हाला पाकिस्तानात जाऊ द्या."
या घटनेने दोन्ही देशांमधील नागरी संबंधांत गुंतागुंत र्निमाण झाली आहे हे समजते या प्रकरणाची चौकशी प्रशासनाकडून सुरू असून, संबंधित महिलांशी बोलून परिस्थितीवर तोडगा काढायचा प्रयत्न सुरू आहे. त्याबरोबरच, बॉर्डरवरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
पहिला श्रावण सोमवार , वसईच्या शिवालयात महादेवाची पूजा अर्चा ,जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची रिघ ,भालीवली ईश्वरपुरी येथे विशाल भंडारा

पहिला श्रावण सोमवार , वसईच्या शिवालयात महादेवाची पूजा अर्चा ,जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची रिघ ,भालीवली ईश्वरपुरी येथे विशाल भंडारा

श्रावण मासारंभाच्या पहिल्या सोमवारी वसईच्या शिवालयात पहाटे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तर येथील शिवालयात भोळ्या महादेवाच्या पिंडीवर पूजा अर्चा करून जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी रिघ लागली होती.यातील प्राचीन मंदिरांपैकी तुंगार अरण्यातील ईश्वरपुरी च्या निसर्गरम्य आत्मलिंगेश्वर मंदिरात व भालीवली येथील जागृत महादेव वृंदावन टेकडी मंदिरात विशाल भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते .याचा लाभ आलेल्या भाविकांनी घेतला.या भंडाऱ्यात उपवासाला चालणारे पदार्थही होते.अगदी संध्याकाळ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121