ऑपरेशन सिंदूर दरम्यान पकिस्तानच्या फाळणीचा विषय पुन्हा चर्चेत आला. नजीकच्या भविष्यात पाकिस्तानची फाळणी होईल का? याबद्दल जाणून घेताना, आपण गेल्या दोन लेखांमध्ये बलुचिस्तान आणि सिंध प्रांताबद्दल माहिती घेतली होती. आता बघूया वायव्य सरहद्द प्रांताकडे...
Read More
आज जगाची नजर भारतावर आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरचे जे धाडसी पाऊल उचलले ते सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. मात्र दहशतवाद पाकिस्तानच्या डीएनए मध्ये खोलवर रुजलेला आहे, काही तुरळक कारवायांनी तो संपवता येणार नाही, असे मत मानवाधिकार संरक्षक, पत्रकार आणि बलुच देशभक्त मीर यार बलुच यांनी व्यक्त केले. बुधवारी त्यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले, त्यातून त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याविषयी आवाहन केले आहे.
(Suicide Car Bomb hits school bus in Pakistan) पाकिस्तानच्या नैऋत्येला असणाऱ्या बलुचिस्तान प्रांतातील खुजदार जिल्ह्यात बुधवारी २१ मे रोजी शाळेच्या बसवर आत्मघातकी कार बॉम्बरकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल ३८ जण जखमी झाले, असे असोसिएटेड प्रेसने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
बलुच प्रतिनिधी मीर यार बलोच यांनी बुधवारी पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. या प्रदेशात पाकतर्फे दशकांपासून सुरू असलेला हिंसाचार, आणि मानवी हक्कांचे उल्लंघन यामुळे बलुच जनतेने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. समाजमाध्यम ‘एक्स’वर त्यांनी ही घोषणा केली असून ती ट्रेंडींग होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तानमधील पाकिस्तानी सैन्यावरील लक्ष्यित हल्ल्यांची संख्या सातत्याने वाढत असून, स्वतंत्र बलुचिस्तानच्या मोहिमेने पाकिस्तानची पुन्हा झोप उडविली आहे. त्यात भारतातील मोदी सरकार आणि आता अमेरिकेच्या ट्रम्प सरकारनेही दहशतवादाविरोधी कठोर धोरण स्वीकारल्याने पाकिस्तानची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे.
Bus accident Balochistan पाकिस्तानातील बलुचिस्तानच्या नोशकीमध्ये रविवारी १६ मार्च २०२५ रोजी झालेल्या एका ताफ्यातजवळील स्फोटात पाकिस्तानच्या फ्रंटियर कॉर्प्सच्या तीन सैनिकांसह पाच जण ठार झाले आणि किमान ३० जखमी झाले आहेत. बीएलएच्या बंडखोरांना सुमारे ४४० प्रवाशांसह ट्रेनचे अपहरण केल्यानंतर काही दिवसांनंतर ही घटना घडली आहे.
पाकिस्तान हा जगाच्या पाठीवरचा असा देश आहे, ज्याने भारताचे नुकसान करण्याच्या नादाने स्वतःच्या पायावरच धोंडा मारून घेतला आहे. वास्तविक पाहता, स्पर्धा ही चांगलीच; मात्र त्यातील हेतू स्वतःची प्रगती हा असावा. मात्र, स्वतःला मिळाले नाही, म्हणून भारतालादेखील मिळता कामा नये. यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले आहे. मात्र, त्यांच्या हाती काहीही आजवर लागलेले नाही. त्यांनी पेरलेला दहशतवाद आज त्यांच्यावरच उलटला आहे. दि. १० मार्च रोजी बलुचिस्तानमधील नसीराबाद येथे घडलेली प्रवासी रेल्वे अपहरणाची घटना ही पाकिस्तानच्या अंतर्गत सु
पाकिस्तानच्या संसदेत नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान मौलाना फज्ल रेहमान या खासदाराने धक्कादायक विधान केले असून, त्याने बलुचिस्तानही बांगलादेशप्रमाणे स्वतंत्र होण्याची शक्यता वर्तवली आहे. ही राजकीय वदंता नाही, तर पाकिस्तानच्या डळमळीत अस्तित्वाचे प्रतिबिंबच आहे. एकीकडे अर्थव्यवस्थेचा र्हास, दुसरीकडे कट्टरतावादाचा वाढता प्रभाव आणि तिसरीकडे स्वायत्ततेच्या लढ्याने पेटलेले प्रांत, या सर्व घटकांनी पाकिस्तानचे भवितव्य अंधारात ढकलले आहे. बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानच्या एकूण भूभागाच्या ४४ टक्के एवढा मोठा भूभाग. मा
Balochistan Firing पाकिस्तान येथील बलुचिस्तानातील एका महामार्गावर अज्ञात हल्लखोरांनी अनेक वाहनांवर हल्ला केला. यावेळी पंजाब प्रांतातील लोकांची हत्या करण्यात आली आहे. बलुचिस्तानातील या हल्ल्यात २३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लोकांवर अमानुष अत्याचार करत असंख्य वाहने पेटवली आणि तिथून पळ काढण्याचे कृत्य हल्लेखोरांनी केले. बलुचिस्तानातील मुसाखेल जिल्ह्यात २६ ऑगस्ट रोजी हा हल्ला झाला आहे.
पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांची सुरक्षा आणि ‘चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर’ परियोजनेची सुरक्षा जर पाकिस्तानला करता येत नसेल, तर योजनेच्या आणि चिनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चीन आपले सैन्य पाकिस्तानमध्ये तैनात करेल, असा नुकताच चीनने पाकिस्तानला धम भरला. यावर चीनचा मांडलिक असलेला पाकिस्तान काय बोलणार? चीनची हाँजी हाँजी करण्याशिवाय पाकिस्तानच्या हातात उरले तरी काय?
बलुच लिबरेशन आर्मी’ने काल-परवाच माच आणि बोलन शहरांमध्ये पाकिस्तानी सैन्याला जेरीस आणले. त्यात दहा पाकिस्तानी सैनिक मारले गेले, तर काही सैनिक ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने बंधक बनवले आहेत. ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने दावा केला की, त्यांनी माच आणि बोलन शहरांवर कब्जा केला आहे. ’बलुच लिबरेशन आर्मी’पुढे पाकिस्तानी सैन्य नामोहरम झालेले दिसते. दुसरीकडे, महरंग बलोच या धाडसी तरुणीमुळेही पाकिस्तानच्या नाकी नऊ आले आहेत.
पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचाराविरोधात बलुच नागरिकांचे आंदोलन सुरूच आहे. हे थांबवण्यासाठी बलुच तरुणांना बेपत्ता केले जात आहे. बलुचिस्तानमधील डेरा बुगती भागात १० लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. तेथे पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानी सुरक्षा दलांसोबत घरोघरी जाऊन शोधमोहीम राबवून १० जणांना बेपत्ता केले. त्यात काही विद्यार्थीही आहेत.
पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये ५२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत ५० हून अधिक जखमी झाले आहेत. हे लोक पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिनी निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आत्मघातकी हल्ला झाला आहे. दि. २९ सप्टेंबर रोजी बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यातील एका मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला.
आता बलुचिस्तान हा सगळाच प्रांत इंग्रजांनी नव्याने निर्माण होणार्या पाकिस्तानला दिलेला होता. खरान, लास बेला आणि मकरान या संस्थानांनी पाकिस्तानात विलीन होण्याचा निर्णय घेतला. पण, कलातचे अधिपती खान मीर अहमद यारखान यांना स्वतंत्र राहायचं होतं. यांनी काय करावं? इंग्रज व्हाईसरॉयसमोर म्हणजे माऊंटबॅटनसमोर आपली बाजू मांडण्याचं वकीलपत्र यांनी चक्क महंमद अली जिनांनाच दिलं. बोकडाने आपली मानच नव्हे, अख्खं शरीरच लांडग्याच्या तोंडात दिलं.
पाकिस्तानामध्ये वेगवेगळे गट स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. पश्तून, बलूच आणि इतर मुस्लिम जातींवरील अत्याचाराविरोधात शुक्रवारी (१८ ऑगस्ट २०२३) निदर्शने झाली. राजधानी इस्लामाबादमध्ये असलेल्या सर्वोच्च न्यायालयासमोर पश्तून नेत्यांनी आयोजित केलेल्या या निदर्शनात हजारो लोक सहभागी झाले होते. यावेळी पश्तून नेत्याने पश्तूनांचा आवाज ऐकला नाही तर स्वातंत्र्यासाठी युद्ध होईल, अशी धमकी दिली आहे.
पाकिस्तानमधील सोमवारच्या पेशावरच्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याने पुनश्च या देशातील सुरक्षा यंत्रणांचे धिंडवडे निघालेच. पण, या हल्ल्यानंतर सुरक्षायंत्रणांमधील अक्षम्य अपयशाचे आत्मपरीक्षण करण्यापेक्षा तालिबान आणि भारतावर दोषारोपणाचीच पुनरावृत्ती सवयीप्रमाणे पाक सरकारने केली असली तरी हा देश अखेरच्या घटका मोजतोय, त्याचाच हा बॉम्बहल्ला आणखीन एक पुरावा...
कट्टर जिहादी मानसिकतेच्या पगड्याखाली असलेल्या पाकिस्तानात हिंदू धार्मिकस्थळांची दुर्दशा होणे म्हणा अगदी स्वाभाविकच. आज 75 वर्षांनंतरही हिंदू बांधवांसह हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांचे पाकिस्तानातील सत्र काही थांबलेले नाही.
आपला शेजारी देश पाकिस्तान मध्ये पुराने हाहाकार माजला आहे. आधीच टोलमास आर्थिक स्थिती असलेल्या पाकिस्तानसाठी हे दुहेरी संकट ओढवले आहे
पाकिस्तानातील वाढती महागाई आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या भीषण स्थितीचा सामान्य पाकिस्तानींच्या क्रयशक्तीवर गंभीर परिणाम झाला आहे. तसेच, विविध वस्तूंच्या किमतींनी आज तेथे सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. परिणामी, ईदसारख्या सणाच्या दिवशीही पाकिस्तानमधील बाजारपेठा गजबजलेल्या दिसत नाहीत की, उद्योजकांची कुठलीही भरभराट झाली नाही.
पाकिस्तानची सोशल मीडिया मॉडेल कंदिल बलोचची हत्या दि. १४ जुलै, २०१६ साली तिच्याच भावाने वसीम अजीमने केली होती. तिच्यामुळे घराण्याची इज्जत गेली, लोकं नावं ठेवतात, म्हणून तिचा गळा दाबून तिला ठार मारले, असे वसीमने पोलिसांना गुन्हा कबुल करताना सांगितले.
टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तान संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर एकीकडे संपूर्ण पाकिस्तान हतबल दिसत होता, तर दुसरीकडे बलुचिस्तानच्या लोकांनी पाकिस्तानच्या पराभवाचा आनंद साजरा केला.
२०१२ ते २०१७ पर्यंत ५०० पेक्षा अधिक ‘हजारा’ बलुचिस्तानची राजधानी क्वेटामध्येच दहशतवादी हल्ल्यांमध्ये मारले गेले आणि क्वेटा प्रत्यक्षात हजारांच्या ‘घेट्टो’मध्ये परिवर्तित झाल्याचे दिसते. इतके होऊनही ‘हजारा’ समुदायावरील हल्ल्यांविरोधात पाकिस्तानी लष्कराची भूमिका कायम उपेक्षेचीच राहिली.
पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रातांत बलुच नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महिला कार्यकर्त्या करीमा बलोच यांचा कॅनडा येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. करीमा बलोच रविवारपासूनच बेपत्ता होत्या; त्यांचा मृतदेह टोरंटोमध्ये आढळला.
आजवर चाललेले हे अत्याचारच जणू अधिक संघटितपणे करण्यासाठी आणि बलुचींच्या मनात पाकिस्तानप्रती राष्ट्रभावना विकसित करण्यासाठी या शिबिरांचा पाकिस्तानने घाट घातलेला दिसतो. त्यामुळे स्वत:ला पाकिस्तानी न मानणार्या बलुचींनी त्यांची संस्कृती, ओळख, रितीरिवाज मातीत गाडून पाकिस्तानी मुस्लीम म्हणूनच जगावे, यासाठी हा सगळा आटापिटा.
बलुचिस्तानात चीनकडून उभारण्यात येणार्या ग्वादर बंदरावर वचक ठेवण्यासाठी चाबहार या प्रकल्पाचे महत्त्व होते. जर चीन इराणमध्ये ४०० अब्ज डॉलर गुंतवणूक करुन जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणार असेल, तर चिनी प्रकल्पांपुढे भारताचा रेल्वेमार्ग बांधणी प्रकल्प किरकोळ आहे.
पाकिस्तानात मानवाधिकारांची पायमल्ली; इमरान सरकारला पोलखोलीची भीती
एक इस्लाम मतानुयायी केवळ आपल्या वर्चस्वासाठी, श्रेष्ठत्वासाठी दुसर्या इस्लाम मतानुयायाशी झगडतो आहे किंवा परस्परांचा शत्रू झाला आहे, इतरांचे अस्तित्व त्याला नकोसे झाले आहे. मात्र, भारतात अशी परिस्थिती नाही. इथे मुस्लीम व्यक्ती इस्लाममधील कोणत्याही परंपरेचे, तत्त्वज्ञानाचे पालन करू शकते, त्याच्याविरोधात कोणी काही कारवाई करताना दिसत नाही. म्हणूनच भारतातील मुस्लिमांनी स्वतःला भाग्यशाली समजले पाहिजे. हेच मत पद्मभूषण पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मार्क टुली यांनी नुकतेच व्यक्त केले.
पाकिस्तानने काश्मिरबाबत भ्रामक व तथ्यहीन वक्तव्ये करण्याऐवजी आपल्या ताब्यातील बलूचिस्तान, पख्तूनिस्तान, सिंध आणि अन्य भागांतील लोक अचानक कसे गायब होतात तसेच न्यायालयीन कोठडीतच अनेकांचे बळी कसे जातात, यावर लक्ष देण्याचा सल्ला यावेळी भारताने दिला.
पाकिस्तान आणि बलुचिस्तानचा वाद चांगलाच चिघळत असताना शनिवारी बलुचिस्तानमध्ये अतिकेरी हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन घटनांमध्ये १० पाकिस्तानी सैनिक मारले गेले.
बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळावे यासाठीच्या सशस्त्र संघर्षाला मोठा इतिहास आहे. पण, दहशतवादी पाकिस्तानबरोबर साम्राज्यवादी चीनने ‘ना-पाक’ आघाडी केल्याने बलुच राष्ट्रवाद्यांच्या अस्तित्वावरच मोठे संकट निर्माण झाले आहे.
भारताला अल्पसंख्याकांचे हित जपण्याचे उपदेशाचे डोस देणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी बलुचिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या दयनीय परिस्थितीकडे डोळझाकच केलेली दिसते. तेव्हा, अल्पसंख्याकांवरील अन्याय-अत्याचारामुळे धुमसत्या बलुचिस्तानमधील परिस्थितीचा आढावा घेणारा हा
चीन असेल अथवा सौदी अरेबियाच्या रुपाने सीपेकमधील नवा भागीदार, परकीय गुंतवणुकीच्या ओघात बलुचिस्तानसारख्या प्रांतात अस्वस्थता वाढत चालली असून त्याचा एकूणच पाकिस्तानच्या सार्वभौमत्त्वावर विपरित परिणाम होऊ शकतो.
पाकिस्तानातील निवडणुकीला बॉम्बस्फोटांच्या दहशतीचे गालबोट लागले. तरीही मतदान पार पडले असून पाकिस्तानी जनतेने दिलेला कौलही निकालाच्या स्वरुपात लवकरच जाहीर होईल. तेव्हा, पाकिस्तानातील प्रांतवार राजकीय समीकरणं, शरीफांची अटक, जातीपाती-समुहांची भूमिका, लष्करी दबाव पाहता पाकच्या सरजमींवर कुणाचा चाँद चमकणार, ते पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.
निरनिराळ्या फाटाफुटींच्या उंबरठ्यावर उभा असलेला पाकिस्तान आता निवडणुकींना सामोरा जाणार आहे. इतके अंतर्विरोध असलेले कदाचित ते पहिलेच राष्ट्र असावे.