पाकिस्तानने मॅच हरल्यानंतर बलुचिस्तानमध्ये आनंदोत्सव

    12-Nov-2021
Total Views |
pakisthan  3_1  


बलुचिस्तान - टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तान संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर एकीकडे संपूर्ण पाकिस्तान हतबल दिसत होता, तर दुसरीकडे बलुचिस्तानच्या लोकांनी पाकिस्तानच्या पराभवाचा आनंद साजरा केला.



पाकिस्तान हरल्यानंतर बलुच लोक नाचत असल्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये बलुचिस्तानमधील लोक पाकिस्तानच्या पराभवाबद्दल एकमेकांचे अभिनंदन करताना दिसत आहेत, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते नाचताना दिसत आहेत. पाकिस्तान वंशाचे कॅनेडियन पत्रकार तारिक फतेह यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. बलूच नॅशनल मूव्हमेंट (यूके झोन)चे अध्यक्ष हकीम बलोच यांनीही ट्विटरवर बलुच लोकांचा नाचतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.



बलुच राष्ट्रीय चळवळ म्हणजे काय?
बलुचिस्तान हा पाकिस्तानचा प्रांत आहे. त्याची राजधानी क्वेटा आहे. बलुचिस्तानचे लोक पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. तिथले लोक बलुच नॅशनल मुव्हमेंट या नावाने चळवळ चालवत आहेत. बलुचिस्तानला पाकिस्तानपासून मुक्त करणे हा त्याचा उद्देश आहे. आंदोलन दडपण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर बलुच लोकांवर अत्याचार करत आहे. पाक लष्कराच्या अत्याचाराला कंटाळून बलुच कधी-कधी त्यांच्यावर हल्ले करतात. अलीकडेच चिनी अभियंत्यांच्या बसमध्ये झालेल्या स्फोटाचे कनेक्शनही बलुचिस्तानमधून सापडले होते.