बलूचिस्तान, पख्तुनिस्तान आणि सिंधमध्येही डोकवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2019
Total Views |


संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत भारताचा पाकवर हल्ला


जिनिव्हा
: संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या परिषदेत (यूएनएचआरसी) काश्मिर मुद्द्यावर खोटारडे आरोप करणार्‍या पाकिस्तानवर भारताने जोरदार हल्लाबोल केला. पाकिस्तानने काश्मिरबाबत भ्रामक व तथ्यहीन वक्तव्ये करण्याऐवजी आपल्या ताब्यातील बलूचिस्ता, पख्तूनिस्तान, सिंध आणि अन्य भागांतील लोक अचानक कसे गायब होतात तसेच न्यायालयीन कोठडीतच अनेकांचे बळी कसे जातात, यावर लक्ष देण्याचा सल्ला यावेळी भारताने दिला. तत्पूर्वी पाकिस्तानने यूएनएचआरसीच्या ४२व्या अधिवेशनात काश्मिरवरुन लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला, परंतु, त्याला त्यात यश आले नाही.


संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या अधिवेशनाला संबोधित करताना भारताच्या सचिव कुमम मिनी देवी यांनी म्हटले की, पाकिस्तान तथ्यांची मोडतोड करुन मांडण्यात पटाईत असून त्याच चुका तो देश पुन्हा पुन्हा करत आहे. अर्थात त्याचेही आता आश्चर्य वाटत नाही. तरीही आम्ही पाकिस्तानला सांगू इच्छितो की, त्याने आधी पाकव्याप्त काश्मि, खैबर पख्तुनख्वा, बलुचिस्तान आणि सिंधमध्ये गायब होणार्‍या तथा बळी जाणार्‍यां लोकांचा विचार करावा, त्यात लक्ष घालावे.


कुमम पुढे म्हणाल्या की, काश्मिरप्रकरणी पाकिस्तानने तयार केलेल्या खोट्या कहाण्यांनी वास्तव बदलू शकत नाही. कलम 370ला हटवणे भारताचा अंतर्गत विषय असून पाकिस्तान भारताविरोधात दहशतवादाला प्रायोजित करत आहे. परंतु, जम्मू-काश्मिरच्या लोकांनी भारताचे नागरिकत्व स्विकारत लोकशाहीवर विश्वास ठेवला व त्याला इतिहास साक्षी आहे. म्हणूनच ते तिथे होणार्‍या प्रत्येक निवडणूकीत सक्रियतेने सहभाग घेतात.


गो नियाझी गो बॅक


भारताने जम्मू-काश्मिरच्या अनुषंगाने कलम ३७० निष्प्रभावी करण्याचा आणि राज्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तान कमालीचा बिथरला तसेच पाकव्याप्त काश्मिर वाचवण्याची धडपड करु लागला. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान इमरान खान यांनी शुक्रवारी पाकव्याप्त काश्मिरच्या मुझफ्फराबाद येथे एका रॅलीचे आयोजन केले तसेच भारताविरोधात गरळ ओकली. परंतु, यावेळी स्थानिकांना भारताविरोधात भडकावण्याचा त्यांचा उद्योग सुरु असतानाच तिथे उपस्थित लोकांनी इमरान खान यांच्याविरोधातच गो नियाझी गो बॅकच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. इमरान खान यांच्याविरोधातील घोषणाबाजीची ही ध्वनिचित्रफित पाकिस्तानमधील मानवाधिकार कार्यकेर्त आरिफ झकारिया यांनी ट्विट केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@