बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तान नव्हे

- समाजमाध्यमांवर बलुच स्वातंत्र्य चळवळ पुन्हा ट्रेंडींग

    14-May-2025
Total Views |
बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तान नव्हे


नवी दिल्ली, बलुच प्रतिनिधी मीर यार बलोच यांनी बुधवारी पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. या प्रदेशात पाकतर्फे दशकांपासून सुरू असलेला हिंसाचार, आणि मानवी हक्कांचे उल्लंघन यामुळे बलुच जनतेने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. समाजमाध्यम ‘एक्स’वर त्यांनी ही घोषणा केली असून ती ट्रेंडींग होत आहे.


एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की बलुचिस्तानच्या लोकांनी त्यांचा "राष्ट्रीय निर्णय" दिला आहे आणि जगाने आता गप्प बसू नये. पाकव्याप्त बलुचिस्तानमधील बलुचिस्तानचे लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि हा त्यांचा राष्ट्रीय निर्णय आहे की बलुचिस्तान हा पाकिस्तान नाही आणि जग आता मूक प्रेक्षक राहू शकत नाही," असे ते म्हणाले आहेत.


त्यांनी भारतीय नागरिकांना, विशेषतः माध्यमांना, युट्यूबर्सना आणि बुद्धिजीवींना आवाहन करून बलुच लोकांना पाकिस्तानी संबोधू नये असे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रिय भारतीयांनो, तुम्ही बलुचांना 'पाकिस्तानचे स्वतःचे लोक' असे संबोधू नये. आम्ही पाकिस्तानी नाही, आम्ही बलुचिस्तानी आहोत. पाकिस्तानी हे पंजाबी असून त्यांना कधीही दहशतवादाचा सामना करावा लागलेला नाही.


पाकव्याप्त काश्मीर मोकळा करावा – बलुचिस्तानची भूमिका


मीर यार बलोच यांनीही पाकव्याप्त जम्मू काश्मीर (पीओजेके) बद्दल भारताच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा दर्शवला. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानवर हा प्रदेश रिकामा करण्यासाठी दबाव आणण्याचे आवाहन केले. मीर यार म्हणाले,

• बलुचिस्तान पाकिस्तानला पीओके रिकामा करण्यास सांगण्याच्या भारताच्या निर्णयाचे पूर्ण समर्थन करतो.

• ढाका येथे ९३,००० सैन्य जवानांवर पुन्हा एकदा आत्मसमर्पणाचा अपमान टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला तात्काळ पीओके सोडण्यास उद्युक्त केले पाहिजे.

• भारत पाकिस्तानी सैन्याला पराभूत करण्यास सक्षम आहे आणि जर पाकिस्तानने लक्ष दिले नाही तर रक्तपातासाठी फक्त पाकिस्तानी लोभी लष्करी जनरल जबाबदार असतील.