Strait of Hormuz : इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या सशस्त्र संघर्षात अमेरिकेने उडी घेतल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यांनंतर चवताळलेल्या इराणने प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलच्या दहा शहरांवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला आहे. यानंतर इराण कच्चे तेल आणि वायूच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची भूमिका घेण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता इराणच्या कायदेमंडळाने होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदी निर्णयाला मान्यत
Read More
प्रतिकुलतेवर मात करत समाजात सेवाकार्याने सकारात्मकता पेरणारे मूळचे बिदरचे, पण मुंबईत स्थायिक झालेले डॉ. ओमप्रकाश गजरे त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
'ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार! नागरिकांसाठी गृहमंत्र्यांनी जारी केले महत्वाचे निर्देश
धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या...
गोगलगायी, बेडूक अशा चाकोरीबाहेरच्या वन्यजीव प्रजातींवर संशोधनाचे काम करणारे प्राध्यापक डॉ. ओमकार विष्णूपंत यादव यांच्याविषयी...
Shab-e-Barat जम्मू-कश्मीरमध्ये विविध ठिकाणी शब-ए-बारात (Shab-e-Barat) गुरूवारी ३१ फेब्रुवारी साजरी करण्यात आली. अनेक मशिदींमध्ये लोक जमले होते. अनेक ठिकाणी नमाज अदा करण्यात आली. याचवेळी सलग सहाव्या वर्षी श्रीनगरच्या जामा मशिदीत शब-ए-बारातला कोणतेही वाईट कृत्य घडले नाही. संबंधित बारातला कोणतंही गालबोट लागले नाही. सुरक्षेच्या अनुश्रंगाने स्थानिक प्रशासनाने मशीद बंद ठेवण्यास सांगितल्याने ओमर अब्दुल्लांनी सोशल मीडियावर ट्विट केलं आहे.
(Waqf Amendment Bill Report) वक्फ सुधारणा विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) गुरुवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना आपला अंतिम अहवाल सादर केला आहे. यावेळी जेपीसी अध्यक्ष जगदंबिका पाल आणि समिती सदस्य निशिकांत दुबे, तेजस्वी सूर्या, संजय जयस्वाल व अन्य उपस्थित होते. अहवाल सादर करताना विरोधी पक्षाचे कोणतेही सदस्य उपस्थित नव्हते.
केंद्राच्या मदतीने आणि राज्यातील प्रशासनाच्या जोरावर ओमर अब्दुल्ला यांच्याकडून अनेकांना चांगल्या कामगिरीची, दमदार सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र, या पातळीवर ओमर अब्दुल्ला सपशेल अपयशी ठरल्याचेच दिसून आले. एकूणच त्यांची पत्रकार परिषद ही सगळेच प्रश्न केंद्रावर टोलवण्यातच खर्ची पडली.
संसद भवनाच्या परिसरात विरोधकांकडून जाणीवपूर्व सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे अध्यक्ष यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा खासदारांच्या गटला संसद भवनाच्या गेटवर कसल्याही प्रकरचे धरणे किंवा आंदोलन करता येणार नाही. संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या उद्देशाने हे कठोर निर्देश देण्यात आले आहेत. १९ डिसेंबर रोजी राहुल गांधी यांनी केलेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्वभूमीवर ओम बिर्ला यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
नवी दिल्ली : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि आयएनएलडी प्रमुख ओमप्रकाश चौटाला ( Omprakash Chautala ) यांचे शुक्रवारी निधन झाले. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
EVM एकीकडे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मविआचे नेते ‘ईव्हीएम’वरुन ‘हात’चलाखी करीत असताना, ‘इंडी’ आघाडीतील त्यांच्याच मित्रपक्षांपैकी नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्ला आणि तृणमूल काँग्रेसच्या अभिषेक बॅनर्जी यांनी ‘ईव्हीएम’वरुन काँग्रेसच्या रडारडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, त्यांच्या भूमिकेला सुरुंग लावला आहे. त्यामुळे अदानी प्रकरणाप्रमाणेच ‘ईव्हीएम’च्या मुद्द्यावरुन काँग्रेस पक्ष राष्ट्रीय स्तरावरही आता एकाकी पडल्याचेच हे द्योतक म्हणावे लागेल.
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ( Om Birla ) यांनी मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी संसद संकुलात काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या निषेधाच्या पद्धती अशोभनीय असल्याचे सांगितले. विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे वर्तन संसदीय परंपरेच्या विरुद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नवी दिल्ली : वारंवार स्थगन प्रस्तावांद्वारे लोकसभेचे कामकाज चालू दिले नाही तर रविवारीदेखील कामकाज चालवण्यात येईल, असा इशारा लोकसभा ( Loksabha ) अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांना दिला.
उल्हासनगर : उल्हासनगर १४१ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कुमार आयलानी ( Kumar Ailani ) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार ओमी कलानी यांचा दणदणीत पराभूत करून ३० हजार, ७५४ मताधिक्याने विजय संपादन केला. मतमोजणी सुरू झाल्यापासून कुमार आयलानी आघाडीवर होते. त्यांना एकूण ८२ हजार, २३१ मते तर राष्ट्रवादी तुतारीचे उमेदवार ओमी कलानी यांना ५१ हजार, ४७७ मते मिळाली. मनसे ४ हजार, ९६९ वंचित ७ हजार, ४७३ तर नोटाला १ हजार, ७५९ मते मिळाली.
मुंबई : “संविधानाची अनेकदा मोडतोड करणार्या आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कायम अवमान करणार्या काँग्रेसला जनता यावेळी माफ करणार नाही. आतापर्यंत केलेल्या संविधानाच्या अवमानाबद्दल आधी काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे,” अशी मागणी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू ( Kiren Rijiju ) यांनी गुरुवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी केली.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘कलम ३७०’ रद्द केल्यावर पाच वर्षांत त्या राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारली. राज्यातील फुटीरतावाद व दहशतवादही आटोक्यात आला. पण, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता गेल्यानंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात पुन्हा ‘कलम ३७०’चे तुणतुणे वाजविले गेले. त्यामुळे अशा फुटीरतावादी शक्तींना विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही आळा घालण्याचे आव्हान ओमर अब्दुल्ला सरकारसह केंद्र सरकारलाही पेलावे लागणार आहे.
( Restoration of Article 370 ) केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर तिथे १० वर्षांनी पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळाल्याने त्यांनी नवीन सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेने बुधवारी दि. ६ नोव्हेंबर रोजी केंद्रशासित प्रदेशाचा विशेष दर्जा देणारे कलम ३७० पुनर्स्थापित करण्यासाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यास सांगणाऱ्या ठरावास मंजुरी दिली आहे. विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पीपल्स डेमोक्रॅ
मुंबई : ( Ashish Shelar ) “विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कॉँग्रेसने मुंबईत जे ११ उमेदवार दिले आहेत, त्यातील केवळ दोनच उमेदवार मराठी आहेत. इतका पराकोटीचा मराठीद्वेष दाखवणार्या कॉँग्रेसबद्दल आपली भूमिका काय आहे, हे स्पष्ट करा,” असे आव्हान मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.
Jammu and Kashmir विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) येथे झालेल्या बैठकीत नुकताच गदारोळ झाला. ही बैठक समोवारी ३ नोव्हेंबर २०२४ रोजी झाली होती.जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निव़डणुकच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत कलम ३७० आणि ३५ए हटवण्याच्या विरोधात ठराव मांडण्यावरून गदारोळ निर्माण झाला आहे.
जम्मू आणि काश्मीर राज्याला केंद्रशासित प्रदेश होऊन ५ वर्ष झाली. त्या निमित्ताने ५ व्या स्थापना दिवसाचा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवापासून राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्या पक्षातील लोकं दूर राहिले. सत्ताधारी पक्ष नॅशनल कॉन्फरन्स यांच्या नेत्यांच्या मते ते जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेश मानतच नाही. तिथेच दुसऱ्या बाजूला मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाने यास काळा दिवस असे घोषित केले होते.
ओमार अबदुल्लाह यांनी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर, चौथ्यांदा दहशतवादी हल्ला झाला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला परिसारात, २४ ऑक्टोबरच्या रात्री काही दहशतवाद्यांनी सैनिकांच्या गाडीवर हल्ला केला. या चकमकीत २ सैनिकांचा आणि २ पोटर्सचा मृत्यू झाला आहे.
काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) येथे कामावर येणाऱ्या मजुरांवर दहशतवादी हल्ले करत आहेत. गुरुवारी २४ ऑक्टोबर रोजी दक्षिण काश्मीर येथे त्राल जिल्ह्यात एका स्थलांतरित मजुराला दहशतवाद्यांना गोळ्या घालून जखमी केले. दहशतवादी हल्ल्यात मजूर जखमी झाला असल्याची माहिती आहे. उमर अब्दुल्ला यांचे सरकार आल्यानंतर जम्मू-काश्मीर येथे मोठ्या प्रामाणात दहशतवाद निर्माण होणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.
जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) येथे उमर अब्दुल्लाचे सरकार येऊन काही दिवस झाले आहेत. नुकतीच उमर अब्बुल्लाने जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. मात्र त्यानंतर आता जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांचे सावट निर्माण झाल्याची माहिती आहे. मात्र अशातच बिहार येथे राहणाऱ्या अशोक चौहान नावाच्या युवकावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे.
Omar Abdullah Cm जम्मू-काश्मीर येथे झालेल्या विधानसभा निवडणुतकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. जम्मू-काश्मीर राज्यात ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले आहेत. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
( Omar Abdullah )नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, काँग्रेसने सध्या तरी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला नाही.
केंद्र आणि राज्य शासन हे समाजातील वंचित, गरीब घटकांसाठी अनेक योजना राबवित असते.
राज्यातील महिलांना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी 'हर घर दुर्गा' अभियान राबवले जाणार असल्याची घोषणा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शनिवार, दि. २८ सप्टेंबर रोजी केली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कलम ३७० आणि ३५ अ पुन्हा लागू करणे, पाकिस्तानसोबत चर्चा करणे आणि राजकीय कैद्यांची सुटका करणे; अशी आश्वासने अब्दुल्ला कुटुंबाच्या नॅशनल कॉन्फरन्सने जम्मू – काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीसाठी दिली आहेत.
केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा ‘ओमन चांडी लोकसेवक पुरस्कार’ राहुल गांधी यांना जाहीर झाला. माझेच लोक त्यांची (म्हणजे माझीच) संस्था आणि मलाच पुरस्कार हे पाहण्याचे सौभाग्य सध्या सबंध देशाला राहुल गांधी यांनी दिले आहे.
ओमानची राजधानी मस्कत येथे मंगळवार, दि. १६ जुलै २०२४ एका मशिदीजवळ झालेल्या गोळीबारात चार जण ठार आणि अनेक जण जखमी झाले. ओमानमधील वाडी अल-कबीर येथील इमाम अली मशिदीजवळ ही घटना घडली. शिया मुस्लिमांच्या कार्यक्रमाला लक्ष्य करण्याचे हल्लेखोराचे उद्दिष्ट होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी आवाजी मतदानाने निवड झाली आहे. त्यांनी निवडणुकीत काँग्रेसचे कोडीकुन्नील सुरेश (के सुरेश) यांचा पराभव केला. ओम बिर्ला यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी संपूर्ण सभागृहाचे अभिनंदन करतो. येत्या पाच वर्षात तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल असा विश्वास आम्हा सर्वांना आहे.
लोकसभा अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आता संपली आहे. भाजपप्रणित रालोआकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. मंगळवार, दि. २५ जून २०२४ ला लोकसभा सचिवालाय कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उपसभापतीपद विरोधकांना दिले जाऊ शकते.
होळकर घराणे मुळातच हे शिवभक्त होते. त्यामुळे अहिल्यादेवी यांनी श्री सोमनाथ, श्री ओंकारेश्वर, श्री नागनाथ, श्री त्र्यंबकेश्वर, श्री काशी विश्वनाथ, श्री घृष्णेश्वर आदी शिवमंदिरांचा जीर्णोद्धार केला. अहिल्यादेवी यांनी आपले राज्य हे शिवार्पण करून, राज्यकारभार केला. म्हणून, त्यांच्या हातात आपल्याला शिवपिंड दिसते. त्यांच्या दरबारी आदेशावर ‘श्रीशंकर आज्ञेवरून’ अशी राजमुद्रा असे. भगवान शिवशंकराच्या नावानेच त्यांनी लोककल्याणकारी राज्य चालवले. तसेच संपूर्ण देशभरात अहिल्यादेवींनी मंदिरे, वास्तू, जलकुंडे आणि बारवांची न
उद्यापासून रुलका इलेक्ट्रिकल लिमिटेड व होक फूडस इंडिया लिमिटेड या दोन कंपन्यांचे एस एम ई प्रवर्गात आयपीओ बाजारात येत आहेत. गुंतवणूकदारांसाठी हे दोन्ही आयपीओ उद्यापासून म्हणजेच १६ मे ते २१ मे २०२४ पर्यंत गुंतवणूकीसाठी खुले असणार आहेत. जाणून घ्या याबाबत अधिक माहिती....
जम्मू- काश्मिरमधून स्वातंत्र्यानंतर जवळपास ७५ वर्षांनी ‘कलम ३७०’ हटवण्यात मोदी सरकार यशस्वी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचा संपुर्ण इतिहास आदित्य जांभळे दिग्दर्शित आणि आदित्य धर निर्मित ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. मात्र, एक धक्कादायक बाब अशी ही ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट आखाती देशांमध्ये दाखवण्यास मनाई करण्यात आली आहे. एका महत्वाच्या आणि राजकीय दृष्ट्या महत्वपुर्ण असणाऱ्या या विषयावरील चित्रपटाला हा मोठा धक्का आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या. मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी एक महत्वपुर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. या निर्णय होता जम्मू- काश्मिरमधूल कलम ३७० हटवण्याचा. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मिरमधून कलम ३७० हटवण्यात आले. ही संबंध घटना काय होती? हा निर्णय कसा घेतला गेला आणि त्यासाठी काय प्रयत्न केले गेले या सर्व गोष्टी आदित्य जांभळ दिग्दर्शित आणि आदित्य धर निर्मित 'आर्टिकल ३७०' या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. २३ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून यात दाखवलेल्या सर्व घटना सत्य आ
ठाणे पूर्वेकडील कोपरीवासियांना केंद्र सरकारकडून दोन नवीन जलकुंभांची भेट मिळाली आहे. भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या प्रयत्नाने कोपरी येथील जुन्या जलकुंभांच्या जागी दोन नवीन जलकुंभ उभारण्यात येणार असून, यापुढील काळात कोपरीवासियांना सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.
पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहूल नार्वेकरांच्या नावाची घोषणा करत त्यांची नियुक्ती केली आहे. अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
देशाच्या अमृत काळामध्ये जी उद्दिष्टे ठरवले आहेत, त्यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि विधिमंडळाची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, दि. २७ जानेवारी रोजी केले.महाराष्ट्र विधानसभेत ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी दृकश्राव्यव्दारे (ऑनलाईन) पंतप्रधान मोदी यांनी या परिषेदेला संबोधित करून शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राज्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 'इंडी' आघाडी उघडणाऱ्या काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच जाहीरनामा समिती स्थापन केली. मात्र, त्यात महाराष्ट्रातील एकाही नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या राज्यातील नेत्यांवर काँग्रेसचा 'भरवसा नाय का?', अशी चर्चा प्रदेश काँग्रेसच्या वर्तुळात सुरू झाली आहे.
लोकसभा सुरक्षाभंगाचे प्रकरण अतिशय गंभीर असून त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. मात्र, काही राजकीय पक्षांकडून या घटनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न अतिशय दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले आहे.
'शिख फॉर जस्टिस'चे गुरपतवंत सिंग पन्नू यांनी संसद भवनात घुसून गोंधळ घालणाऱ्या लोकांना 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. 13 डिसेंबर रोजी लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी सभागृहात उडी टाकून गोंधळ घातला. त्यात सहभागी असलेल्या ७ जणांपैकी ६ जणांना (विशाल-वृंदा, नीलम देवी, अमोल शिंदे, सागर शर्मा, डी मनोरंजन) पोलिसांनी अटक केली आहे. हे सहा आरोपी 4 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि काही काळापासून ही घटना घडवण्याचा कट रचत होते. संसदेत हे कृत्य करण्यापूर्वी त्यांनी रेके केल्याचेही बोलले जात आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून लोकसभेत कामकाज सुरू असताना सुरक्षा व्यवस्थेला बगल देत दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उड्या मारल्या. सभागृहात धूर पसरविण्यात आला. यावेळी खासदारांनी या हल्लेखोरांना पकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. दरम्यान, याविषयी उच्चस्तरीय चौकशीस सुरूवात झाली आहे.
कॅश फॉर क्वेरी प्रकरणात टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा केली. यावेळी लोकसभा अध्यक्ष म्हणाले, "महुआ मोइत्रा यांचे वर्तन अनैतिक आणि अशोभनीय असल्याचा समितीचा निष्कर्ष हे सभागृह मान्य करते. त्यामुळे त्यांनी खासदार म्हणून कायम राहणे योग्य नाही."
पैशाच्या बदल्यात प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भात शुक्रवारी लोकसभेत ठराव मंजूर करण्यात आला. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मोईत्रा यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव मांडला, त्याला सभागृहाने आवाजी मतदानाने मंजुरी दिली.
विरोधी पक्ष माफियांना पोसतोय का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. माफिया मुख्तार अन्सारीच्या मुलाने आपल्या वडिलांना बांदा ऐवजी भाजपचे सरकार नसलेल्या राज्यातील तुरुंगात हलवण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली आहे. ओमर अन्सारीने आपल्या याचिकेत बांदा तुरुंगात आपल्या वडिलांचीही हत्या केली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेश सरकार आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्रास देत असल्याचा आरोपही उमरने केला आहे. सोमवारी (४ डिसेंबर २०२३) ही याचिका दाखल करण्यात आली.
आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात. झोपताना, जेवताना गोष्ट ऐकायची परंपराच असते लहानपणी. आई, आजी व आजोबांकडे वार लागलेले असतात. लहान वयात जन्मजात असलेली ज्ञानतृष्णा, अशी कथा ऐकून शमवली जाते आणि म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीत, भारतीय परंपरेत गोष्टींतून मूल्यशिक्षण द्यायची पद्धत पुरातन काळापासून रूढ झाली आहे.
नुकतेच महाराष्ट्रातील २३५९ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका झाल्या आणि त्यांचा निकालही लागला. मराठा आरक्षण, राज्यातील काही भागांमध्ये पडलेला दुष्काळ, अशा वातावरणात महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत जनतेने भाजपवर आणि महायुतीवर विश्वास व्यक्त केला. आणि उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला. त्यामुळे सतत निवडणुका घ्या,मग कळेल महाराष्ट्रात कोणाची ताकद किती आहे, अशी विधान आपोआप कमी झाली. दरम्यान आता ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. उबाठा गटाने आता लोकसभेच्या कोल्हापूर , इच
साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित सुजय डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' हा चित्रपट १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र, प्रदर्शनाच्या आधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 'श्यामची आई' या चित्रपटाला अॅडव्होकेट बिना पै यांनी भारतातील पहिल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जुन्या 'श्यामची आई' चित्रपटातील गाणी, कथानक यांची उचलेगिरी केल्याप्रकरणी नवीन 'श्यामची आई' चित्रपट निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे.