श्रीनगर : ओमार अबदुल्लाह यांनी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर, चौथ्यांदा दहशतवादी हल्ला झाला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला परिसारात, २४ ऑक्टोबरच्या रात्री काही दहशतवाद्यांनी सैनिकांच्या गाडीवर हल्ला केला. या चकमकीत २ सैनिकांचा आणि २ पोटर्सचा मृत्यू झाला आहे.
भारतीय लष्कराच्या चिनार तुकडीने 'X' या सोशल मीडीया हँडल वर या संदर्भत माहिती शेअर केली. बारामुल्लाच्या बोटपाथरी भागात हा हल्ला करण्यात आला. काही तासांपूर्वीच दक्षिण काश्मीर येथे त्राल जिल्ह्यात एका स्थलांतरित मजूर दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या होत्या. प्रीतम सिंह हे जखमी झालेल्या मजूराचे नाव असून, तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. ७२ तासांमध्ये सैन्याच्या गाडीवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अबदुल्लाह यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत, जवानांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
"तुमचे षडयंत्र हाणून पडू"
भारतीय जनता पक्षाचे जम्मू आणि काश्मीर मधील नेते नेते रविंद्र रैना या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रीया देत म्हणाले " पाकिस्तान कडून वारंवार काश्मीर मध्ये भ्याड हल्ले केले जात आहेत. रात्रीच्या अंधारात लपून निर्दोष मजूरांना मारले जात आहे. ही मानवतेची हत्या आहे. परंतु पाकिस्तानने कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे सगळे प्रयत्न आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी हे पाप केले आहे, त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार आहे. त्याच वेळेस जम्मू आणि काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता म्हणाले की पाकिस्तान द्वारे प्रायोजीत हा हल्ला अत्यंत भ्याड आहे. दुसऱ्या राज्यांतून येणारे मजूर पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी काम करत असतात, त्यांचा काहीच नसताना मृत्यू होते ही बाब अत्यंत दु:खद आहे. लवकरच या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्य यशस्वी होईल यात शंका नाही.