नवी दिल्ली : संसद भवनाच्या परिसरात विरोधकांकडून जाणीवपूर्व सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे अध्यक्षांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा खासदारांच्या गटला संसद भवनाच्या गेटवर कसल्याही प्रकरचे धरणे किंवा आंदोलन आता करता येणार नाही. संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या उद्देशाने हे कठोर निर्देश देण्यात आले आहेत. १९ डिसेंबर रोजी राहुल गांधी यांनी केलेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्वभूमीवर ओम बिर्ला यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
सदर निर्देशानंतर संसद भवनाच्या कोणत्याही गेटवर आंदोलन करता येणार नाही. लोकसभा अध्यक्ष कार्यालयाने हे निर्देश जारी करताना संसदेचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच कामकाज सुरळीत चालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. संसद भवनच्या परिसरात इंडी आघाडीतील नेत्यांनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात आंदोलन करायाला सुरूवात केली. अशातच भाजपचे वरिष्ठ नेते प्रताप सिंह सारंगी आणि खासदार मुकेश राजपूत यांना राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली. दोघांना तातडीने रूगणालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही खासदारांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संसदेबाहेर झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.