हा दुटप्पीपणा नव्हे जूना DNA आहे! जम्मू काश्मीर स्थापना दिवसाला अब्दुल्ला अन् मुफ्तींचे आमदार गैरहजर
01-Nov-2024
Total Views | 280
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर राज्याला केंद्रशासित प्रदेश होऊन ५ वर्ष झाली. त्या निमित्ताने ५ व्या स्थापना दिवसाचा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवापासून राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्या पक्षातील लोकं दूर राहिले. सत्ताधारी पक्ष नॅशनल कॉन्फरन्स यांच्या नेत्यांच्या मते ते जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासित प्रदेश मानतच नाही. तिथेच दुसऱ्या बाजूला मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाने यास काळा दिवस असे घोषित केले होते.
जम्मू काश्मीर मधील नेत्यांच्या या विधानावर संताप व्यक्त करत राज्यापल मनोज सिन्हा म्हणाले की अश्या प्रकारे कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे म्हणजे दुटप्पीपणाचे लक्षण आहे. निवडणूक जिंकल्यावर सगळ्यांसमोर यांनी संविधानावर शपथ घेतली, आणि आता मात्र अधिकृत कार्यक्रमावर ही मंडळी बहिष्कार घालत आहे. ज्यावेळेस कलम ३७० अस्तीतवत होते त्यावेळेस भारतीय सेना यांना आपली शत्रु वाटत होती, इथल्या स्थानिक पक्षांची अडचण हीच आहे की त्यांना आपले वर्चस्व प्रस्थापित करायाचे आहे. प्रत्येक मुद्यावर सरकारला विरोध करणे हीच त्यांच्यासाठी आजादी होती आणि दगड भिरकावणे हा विशेषाधिकार होता. कलम ३७० हटवल्यानंतर पाच वर्षांनी काश्मीरचा चेहरामोहरा बदलला आहे. एकेकाळी भारतापासून फुटून निघण्याचा नारा लावलेल्या काश्मीरमध्ये खुद्द सीएम अब्दुल्ला यांना 'रन फॉर युनिटी'सारखे कार्यक्रम आयोजित करावे लागतात. ज्या काश्मीरमध्ये विकास
म्हणजे केवळ एक दिवास्वप्नच उरेल की काय असे वाटत होते, तिथे आज अनेक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होत आहेत.
जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे आणि जेव्हा तो मिळेल तेव्हा असाच उत्सव साजरा होईल, असे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी कार्यक्रमात सांगितले आहे. परंतु तोवर ओमर अब्दुल्ला किंवा त्यांच्या पक्षाने राज्यातील विकासाच्या नावाखाली सरकारी कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ नये हे उचित आहे काय? असे म्हणत जम्मू-काश्मीरमधील पक्षांना खडे बोल सुनावले आहे.