भारताच्या प्राचीन साहित्यिक वारशाचे जतन, त्याचे डिजिटलायझेशन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने समाजात त्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या 'शास्त्र संग्रहालय आणि संशोधन केंद्रा'चा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. धर्मसंघ सभागृह, श्री स्वामी कर्पात्री जी महाराज आश्रम, श्री धर्मसंघ मठ मंदिर, दुर्गाकुंड, वाराणसी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीसह देशभरातील विद्वान, भिक्षू, संशोधक आणि सांस्कृतिक उत्साही लोक सहभागी
Read More
आमटे हे नाव महाराष्ट्रात माहीत नसणारा विरळच! बाबा आमटे यांचे कार्य, त्यानंतर डॉ. प्रकाश आमटे यांनी त्याचा केलेला विस्तार आणि आता पुढच्या पिढीने त्यात घातलेली भर म्हणजेच ’नवी पिढी, नव्या वाटा’ हे पुस्तक होय. त्या पुस्तकाचा हा परिचय...
आजही बहुसंख्य प्रवासवर्णने लिहिली जातात. अशी प्रवासवर्णने माहिती देणार्या वृत्तपत्रीय लेखनाच्या पातळीवरच राहतात. पण याला छेद देऊन प्रवासवर्णनपर ग्रंथांचे लेखन करून वाचकांना जगप्रवास घडवणार्या डॉ. मीना प्रभु यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल. नुकतेच डॉ. मीना प्रभु यांचे निधन झाले. मात्र, त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने आणि साहित्य अजरामर आहे. त्यांच्या साहित्यकृतींचा, सर्जनशीलतेचा घेतलेला मागोवा...
जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने मराठीतील प्रसिद्ध प्रवासवर्णनपर पुस्तकांविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.
दीपा देशमुख व्यासंगी लेखिका आहेत. एखादा विषय निवडून त्या संबंधी शेकडो पुस्तके वाचायची, त्यांचा अर्क काढून वाचकांसमोर ठेवायचा ज्ञानमार्ग त्यांनी निवडला आहे, त्यामुळे त्यांच्या पुस्तकांतून कित्येक क्षेत्रांची ओळख वाचकाला होत राहते. ’जग बदलणारे ग्रंथ’ हे निवडक 50 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ग्रंथांवरील त्यांचे पुस्तक माहितीप्रद आहे. जगात ज्ञानवर्धनाचा इतिहास लिहायचा झाला, तर जे काही महत्त्वाचे ‘ग्रंथ’ असतील त्यातील 50 ‘ग्रंथा’चा संक्षिप्त परिचय या पुस्तकात करून देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना वाढत अभ्यासक्रम आणि वह्या पुस्तकांमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर आल्या होत्या. पालकांकडूनही विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि इतर बाबींचे देत त्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने काहीतरी प्रयत्न करावेत अशी विनंती अनेकदा राज्य सरकार आणि प्रशासनाकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने या संदर्भात विधायक पाऊल उचलले असून विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे हलके करण्याच्या अनुषंगाने मोठा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून इयत्ता ३ री ते
आयुष्याला कलाटणी देणारे प्रसंग अनेकदा अपघाताने घडतात, म्हणजेच अगदी योगायोगाने. परंतु, विनायक रानडे यांचे आयुष्य हे अक्षरशः अपघाताने बदलले.
1962 साली झालेल्या भारत-चीन युद्धावर आधारित डॉ. अविनाश बिनीवाले यांनी हिंदीमध्ये ‘बोमदिला’ ही कादंबरी लिहिली आणि ती देशभरातील वाचकांच्या पसंतीसही पडली. पुढे याच कादंबरीचा अनुवाद मराठीपासून ते अगदी कन्नड, गुजराती, भाषेतही झाला. नुकतीच गुवाहाटी येथे ‘बोडो साहित्य संमेलना’त ही कादंबरी बोडो भाषेतही प्रकाशित झाली. ‘बोमदिला’चे इंग्रजीवरून केलेले बंगाली भाषांतरही प्रकाशनमार्गावर आहे. त्यानिमित्ताने डॉ. अविनाश बिनीवाले यांच्याशी संवाद साधून उलगडलेला ’बोमदिला’ या कादंबरीच्या अनुवादाचा हा साहित्यिक प्रवास...
आज जवळपास सगळ्यांच्या मोबाईलमध्ये ‘ऑडिओ बुक्स` अगदी सहज असतात. ज्ञानेश्वरी जशी ज्ञानेश्वरांनी स्वतः उलगडून म्हंटली तर ती ऐकण्यात जी मजा येईल ना, तशीच मजा सावरकरांच्या आवाजात त्यांच्या पुस्तकांचे विश्लेषण ऐकण्यात मिळाली असती. एक मात्र नक्की वाटतं, टीव्हीवर होणाऱ्या चर्चासत्रांमध्ये सावरकरांनी भाग घेतला नसता. कारण, `क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे` या तत्त्वावर आयुष्यभर चालले होते सावरकर!
मानवी भावभावनांचा, मैत्रीचा अर्थ सांगू पाहणार्या, एकाच वेळी प्रेम आणि कर्तव्य यांचा-त्यातील एकरूपता, रक्ताच्या नात्यापलीकडील मैत्रीचे अनुबंध जोडणारा ‘साकव’ या कथांमध्ये पाहताना वाचक म्हणून मनात अनेक प्रश्न निर्माण करतात आणि त्यांची उत्तरे शोधताना आपण कथा पुढे वाचत जातो आणि त्या कथानकात आपोआप गुंतून जातो. कथासंग्रहातील कथांचे विषय जरी वेगळे असले तरी त्यांची विषय धाटणी, मांडणी, लेखनशैलीचा बाज लेखकास शेवटपर्यंत टिकवून धरण्यास यश आले आहे.
कवितेच्या क्षेत्रात कवितेची शैली, आशय, प्रतिमा आणि प्रतीके तसेच कवितेतून हाताळलेले विषय याबाबत अनेक कवींनी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. विविध विषयांवरील कवितांचे एकत्रित संग्रह, प्रातिनिधिक कवितासंग्रह, एकाच विषयावरील कविता आणि एकाच आशयाच्या विविध कविता असलेले कवितासंग्रह व दीर्घकविता यांची निर्मिती आजवर मोठ्या प्रमाणात झाली.
सामान्य गृहिणी असलेल्या अरुणा विनोद पवार यांनी कर्करोगाशी सामना करताना दाखवलेले धैर्य आणि त्यांच्या आठवणी जागवणाऱ्या 'अरुणा असण्याचा गंध...' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, दि. २३ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. हे पुस्तक 'ग्रंथाली' प्रकाशनाद्वारे प्रसिद्ध केले जाणार असून संबंधित कार्यक्रम दादरच्या रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे.
आज भक्तिसंप्रदाय उद्धारक वीर वैष्णव तसेच वायुदेवाचे तिसरे अवतार मध्वाचार्य यांचा बद्रीगमन दिन आहे, अर्थातच मध्वनवमी. संपूर्ण कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात मध्वनवमी मोठ्या भक्तिभावाने साजरी करतात. मध्वनवमीच्या औचित्याने मध्वाचार्य यांच्या जीवनाचा व तत्त्वज्ञानाचा थोडासा परामर्श घेण्याचा या शब्दवाहीच्या माध्यमातून हा अल्पसा प्रयत्न.
‘Rethinking Good Governance’ या ग्रंथात सुशासनाबाबतची काही धोरणं स्पष्ट केली आहेत. मुळात हा ग्रंथ भारतीय व्यवस्थेतल्या अनेक अडचणी आणि त्यावरील उपाय यावर आधारलेला आहे. विशेषतः संसद आणि न्यायपालिकेबाबतचे यातले निबंध अनेक महत्त्वपूर्ण व तातडीचे प्रश्न उपस्थित करतात. विशेषतः या दोन मुद्द्यांवर अधिक मंथन होणं व्यवस्थेसाठी अधिक पोषक ठरेल.
मुंबई स्थित भांडुपमधील तरुण युवक विशाल कडणे स्वतःच्या पदरचे पैसे मोडून रुग्णांसाठी गेली २ वर्षे मोफत मास्क, ऑक्सिमीटरचे वाटप करत आहे. स्वतःचे उच्च शिक्षणासाठी ठेवलेले पैसे फुंकून त्यांनी कोव्हीड रुग्नांसाठी मोफत ऑक्सिजन काँसंट्रेटरचे वाटप केले आणि गेल्या २ वर्षात त्यांनी १०० हुन अधिक कोविड रुग्णांना जीवनदान दिले आहे. त्यांच्या याच निस्वार्थी कार्याची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून घेतली गेली आहे. दिनांक २१ जून २०२१ रोजी लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे युरोपचे प्रमुख विल्हेम जेझलर यांनी विशाल कड
ग्रंथसंकलन आणि त्याचे वाचन शांततामयी आणि विवेकी समाजाचे द्योतक आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ग्रंथालयाच्या कपाटात असणारी ही संपदा वाचकांच्या हातात असणे, हेदेखील वाचनसंस्कृतीची वाढ होण्यासाठी आवश्यक असेच आहे. याच जाणिवेतून नाशिकमधून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या संकल्पनेच्या प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. वाचकांना त्यांच्या व्यस्त दिनचर्येमुळे ग्रंथांच्या जवळ येणे शक्य होत नाही. तेव्हा ग्रंथच वाचकांच्या दारी पोहोचवले तर, समाजात वाचन संस्कृती वाढण्यास मदतच होईल, या हेतूने ग्रंथपेटीच्या माध्यमातून ‘ग्रंथ तु
आधीच आर्थिक विवंचनेत दिवसेंदिवस बुडत चाललेल्या पाकिस्तानसारख्या देशाला असा बुरख्यांवरही सरकारी खर्च कसा काय परवडू शकतो? दुसरे म्हणजे, विद्यार्थिनींसाठी बुरख्यापेक्षा इतर शैक्षणिक साहित्य महत्त्वाचे नाही, अशीच या महाशयांची समजूत असावी.
वीरांच्या प्रभावळीतील नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांचे कौशल्यही वाखाणण्याजोगेच. परंतु, याच कालखंडातील बहुधा अखेरचे धडाडीचे आणि धडपडीचे नाव म्हणजे यशवंतराव होळकर!
भारतातील भिलार या पहिल्या पुस्तकाच्या गावाला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. ४ मे २०१७ साली महाबळेश्वरजवळील भिलार या स्ट्रॉबेरी पिकवणाऱ्या गावात राज्य सरकारने पुस्तकाचे गाव साकारले होते
अध्यक्ष, उपाध्यक्षांसह ग्रंथसंग्रहालयाची सर्व पदे वादग्रस्त ?
१२० वर्षे जुने असलेल्या व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाची भूमिका निभावणार्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला सध्या संकटांच्या मालिकेला सामोरे जावे लागत आहे. संस्थेच्या पदाधिकार्यांवर आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार, नियमबाह्य कारभार आदींचे रोज नव्याने गंभीर आरोप होत आहेत. एवढ्या मोठ्या आणि जुन्या संस्थेची ही दुरवस्था का झाली, यामागील नेमके गौडबंगाल काय, याचा दै. ‘मुंबई तरुण भारत’ने घेतलेला हा मागोवा...
पुस्तकांचं गाव, भिलार येथे गावची जत्रा असल्याने, दिनांक १३ ते १५ फेब्रुवारी, २०१९ या कालावधीत पुस्तकांचं गाव हा प्रकल्प तात्पुरता बंद राहणार आहे,
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयावर संकटांची मालिका, कर्मचाऱ्यांचे पगारही थकले
यंदाच्या साहित्य संमेलनात जवळपास १७५-२०० पुस्तकांचे स्टॉल असून सगळे स्टॉल पुस्तक प्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. समेलनात पुस्तकांना मिळणारा वाचकांचा एकूण प्रतिसादाविषयी आम्ही काही स्टॉलधारकांशी सवांद साधला आणि त्यांची मते जाणून घेतली.
‘अशी पुस्तके होती’ या नव्या पुस्तकात १८५० ते १९४५ या काळात प्रकाशित झालेल्या आणि आता वाचकांच्या स्मृतीआड गेलेल्या मराठी पुस्तकांबद्दल त्यांनी सविस्तर लिहीलं आहे.
‘विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटण्यामागील मूळ कारण म्हणजे समाजात वाचनसंपदा वाढावी; असे मला वाटते. अवांतर वाचनामुळे माणसाला चार चांगल्या गोष्टींचे ज्ञान होते.’
पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान या प्रांतांमधला वैराण, मातकट, खडकाळ परिसर, जनतेची बेतास बात आर्थिक परिस्थिती इथपासून ते युरोपमधील सुजलाम सुफलाम वातावरणापर्यंत टोकाच्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या.
पुस्तकांच्या गावाची वर्षपूर्ती हा नक्कीच मनाला आनंद देणारा सोहळा आहे. मात्र, त्याचबरोबर जिल्हास्तरापर्यंत सक्षम वाचनालये उभी करण्याची गरजदेखील मोठी आहे.