या काळात भिलार गावात अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. मूळ गाव भिलार असलेले देशभरातील भिलारवासीय जत्रेच्या निमित्ताने गावास भेट देणार आहेत. त्यामुळे गावातील घरे (वाचनालये) पर्यटकांना आणि शालेय व महाविद्यालयीन सहलींना वाचनाची व पर्यटनाची सेवा देऊ शकणार नाहीत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी सहकार्य करावे, अशी विनंती ग्रामपंचायत भिलार व प्रकल्प कार्यालय, पुस्तकांचं गाव यांनी केली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/