मनाला पूर्णपणे गुंतवणारी अर्ध्या माणसाची अर्धी गोष्ट

    21-May-2022
Total Views | 98

may


मानवी भावभावनांचा, मैत्रीचा अर्थ सांगू पाहणार्‍या, एकाच वेळी प्रेम आणि कर्तव्य यांचा-त्यातील एकरूपता, रक्ताच्या नात्यापलीकडील मैत्रीचे अनुबंध जोडणारा ‘साकव’ या कथांमध्ये पाहताना वाचक म्हणून मनात अनेक प्रश्न निर्माण करतात आणि त्यांची उत्तरे शोधताना आपण कथा पुढे वाचत जातो आणि त्या कथानकात आपोआप गुंतून जातो. कथासंग्रहातील कथांचे विषय जरी वेगळे असले तरी त्यांची विषय धाटणी, मांडणी, लेखनशैलीचा बाज लेखकास शेवटपर्यंत टिकवून धरण्यास यश आले आहे.


प्रकृती तितक्या विकृती’ असे म्हटले जाते. या जगात जेवढी केवढी माणसे आहेत, त्या प्रत्येकाच्या स्वभावात काहीना काही वेगळेपण आहे. प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत, परिस्थिती स्वीकारण्याची - हाताळण्याची पद्धत यात तफावत असते. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात कंगोरे असतात, त्यांच्या सुसंगतीतदेखील विसंगतीची झालर असते! आणि लेखक नेमके हेच टिपत असतो. ‘अर्ध्या माणसाची अर्धी गोष्ट’ हे सागर कुलकर्णी लिखित ‘राजेंद्र प्रकाशना’ने प्रकाशित केलेले पुस्तक याचे एक उदाहरण ठरले आहे.


‘धनंजय’ आणि ‘चंद्रकांत’सारख्या दिवाळी अंकांतून लेखक सागर कुलकर्णी हे वाचकांस परिचयाचे आहेतच. ‘कथा’ हा साहित्यप्रकार हाताळत सातत्याने त्यांनी दिवाळी अंकांसाठी कथालेखन केले आहे. त्यातीलच ‘काकामामाच्या कर्मसोहळ्याची कहाणी,’ ‘हा जय नावाचा इतिहास नाही वर्तमान आहे’ आणि ‘अर्ध्या माणसाची अर्धी गोष्ट’ या विशेष कथांचे संकलन करून त्यांनी संच स्वरुपात आपल्या वाचकांसाठी आणला आहे.


पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून ते अगदी मलपृष्ठाच्या आशयापर्यंत सर्व बाजच वेगळा आढळतो. कथा संपली तरी मनात रेंगाळत राहतील, असे लेखक सागर कुलकर्णी म्हणतात आणि खरेच हे सार्थ ठरते. मानवी भावभावनांचा, मैत्रीचा अर्थ सांगू पाहणार्‍या, एकाच वेळी प्रेम आणि कर्तव्य यांचा-त्यातील एकरूपता, रक्ताच्या नात्यापलीकडील मैत्रीचे अनुबंध जोडणारा ‘साकव’ या कथांमध्ये पाहताना वाचक म्हणून मनात अनेक प्रश्न निर्माण करतात आणि त्यांची उत्तरे शोधताना आपण कथा पुढे वाचत जातो आणि त्या कथानकात आपोआप गुंतून जातो. कथासंग्रहातील कथांचे विषय जरी वेगळे असले तरी त्यांची विषय धाटणी, मांडणी, लेखनशैलीचा बाज लेखकास शेवटपर्यंत टिकवून धरण्यास यश आले आहे.



सागर कुलकर्णी यांच्या कथा जशा वेगळ्या धाटणीच्या आहेत, त्याचे एक कारण म्हणजे त्यांना दिलेली शीर्षके. शीर्षकच वाचकाला त्या कथेचा प्रवास करण्यास प्रवृत्त करतात. आता पहिलीच कथा, ‘काकामामाच्या कर्मसोहळ्याची कहाणी’ - आई आणि वडील दोघांकडून येणारी ही नाती एकाच व्यक्तीला अनेकदा लागू होतात. मग त्यात विशेष ते काय? पण, येथे हे नातं नाही, नाव आहे आणि त्या नात्यास दिलेल्या नावाची ही कहाणी आहे. थोडे बुचकळ्यात पडणारेच आहे हे सर्व, पण हेच या कथेचे वैशिष्ट्य आहे. या ‘काकामामा’ला नाव नाही, आडनावही नाही. जे आहे ते फक्त उमेशच्या म्हणजेच कथेच्या नायकाच्या आई-वडिलांच्या प्रेमाने माणुसकी जपणारे नाते. समाजात अनेक अशा व्यक्ती असतात, ज्यांची सर्वत्र गरज असते. सर्व ठिकाणी ते ‘सेवेच्या ठायी तत्पर’ असे असतात.


पण, तरीही ते उपेक्षित, दुर्लक्षितच असतात. तसा हा काकामामा आहे. हा उपेक्षित असला तरी तो नायकाच्या कुटुंबाशी जोडलेला आहे. दुसर्‍याने म्हणजे स्वतःच्या बापाने केलेले पापाचे परिणाम स्वतः निमुटपणे सोसणारा काकामामा फक्त उमेशकडेच आपले मन मोकळे करू शकतो. हा उमेश त्याच्यासाठी रक्ताच्या नात्याहून अधिक खूप काही आहे. जणूकाही हा काकामामाच्या निराश कुंडलीतला एकमेव शुभ ग्रह आहे. या पहिल्याच कथेत हे रक्ताचे नसले तरी गहिरे असलेले भावबंध लेखक उलगडून दाखवतो. स्वतःकडे फार काही नसले तरी विंदांच्या कवितेप्रमाणे, ‘देणार्‍याने देत जावे’ अशा प्रकारे परोपकार करत राहणारा ‘काकामामा’, प्रचंड कष्ट करत असताना लेखकाने लाडू भरवल्यानंतर गहिवरून येणारा हा संवेदनशील मनाचे प्रतीक वाटतो. वाचताना वाचकाच्या मनातच त्याच्याबद्दल दाटून येते. जसे काही एखद्या जीर्ण वस्त्राप्रमाणे आयुष्यदेखील जरी फाटले तरी हृदयात कायम चांगुलपणाचे टाके घालणार्‍या काकामामाचे सत्य शेवटी लेखक ज्याप्रमाणे मांडतो संपूर्ण मनाला कलाटणी मिळते.



तशीच दुसरी कथा, ‘हा जय नावाचा इतिहास नाही... वर्तमान आहे.’ ही जरी कथा दोन मित्रांची असली तरी औपचारिकरित्या या नात्याची सुरुवात झाली असली विविध टप्प्यातून जात शेवटी ते कसे अतूट बनते आणि एकमेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनते, यावर भाष्य करणारी ही दोन मित्रांची कथा आहे. 2005 ते 2009 या चार वर्षांचा हा प्रवास आहे. जीवनाचा अविभाज्य भाग आणि चारच वर्षांचा प्रवास मनात शंका निर्माण करतो, पण अगदी सुरुवातीलाच ‘वाटलं नव्हतं मी इतका टीकेन, कुणास ठाऊक पुढच्या गटारीला मी असेन की नसेन’ हे जयचे वाक्य पुढे काय घडणार, याची चाहूल देऊनच जातो. असाध्य आजाराने त्रस्त असलेल्या जयची आणि सागरची ही कथा यांचे साल-वारासह संदर्भ येत जातात. सागरच्या मुलाच्या परीक्षा.



गृहस्थ म्हणून असलेली इतिकर्तव्ये, वडिलांच्या पंचाहत्तरीनिमित्ताने होणारे पुस्तक प्रकाशन, सण-उत्सव या सर्वात जरी कुटुंब नातेवाईकांचा उल्लेख आला तरी कथा जय आणि सागरचे बोट सोडत नाही, ती त्यांच्या भोवतीच फिरत राहते. हे दोघे मित्र म्हणजे शरीरं जरी दोन असलीत, तरी मन जणू एकच आहे. जयला होणार्‍या यातना, तो त्रास होतोय. मात्र, सागरला आणि सागरच्या मनातील स्पंदने जय अनुभवतो. गंभीर आजार असूनही त्यावर मात करतो तो जयचा आशावाद, 'Long live friends' आणि 'Long live friendship' म्हणणारा जय हा आशावादाची आणि खर्‍या अर्थाने ‘जया’चे प्रतीक आहे. ‘देव आणि दैव यात फरक आहे आणि या दोघांचे नेहमीच पटते असे नाही’ हे वाक्यच किती अंतर्मुख करणारे आहे! आणि ’ङेपस श्रर्ळींश षीळशपवी’ नव्हे, तर ’ङेपस श्रर्ळींश षीळशपवीहळि’ हे सर्वात शेवटचे वाक्य म्हणजे त्या अंतर्मुखतेचे कळस गाठते.



त्यानंतर येते ती म्हणजे ‘अर्ध्या माणसाची अर्धी कथा.’ याचे हे शीर्षकदेखील अतर्क्य आहे. ही कथा पहिल्या दोन कथांपेक्षा वेगळी ठरते. कारण, या गोष्टीत भूत-प्रेत नसले तरी कथानकात गूढ असे काहीतरी आहे, अनाकलनीय आहे. याच्या कथानकात अर्धी माणसं आहेत आणि अर्धे प्राणी आणि अर्धे कुत्रे! ही कथा या सर्वांच्या तर्कसंगतीची आहे. या कथेतील वाक्यदेखील तशीच अतर्क्य, ‘काळा कातळ, हिरवी पाने आणि पुलाखाली वाहणारे पाणी. सर्व देखाव्याने चांदण्याचा चंदेरी शेला पांघरला होता.’ या वाक्यांचा निसर्गाशी येणारा संबंधदेखील गूढच का, असे वाटते.



लेखकाच्या मित्राच्या आयुष्यात अपघाताने आलेली एक श्वानप्रवृत्तीची व्यक्ती, जिचा स्वभाव अर्धा श्वानासारखा, अर्धा इसमासारखा, रूप भीतीदायक, श्वानांची भाषा, त्याच्या सवयी अवगत; अशी विकृत वाटावी अशी व्यक्ती त्याचा मित्र बनतो, त्याच्या घरात एखाद्या जीवलगाप्रमाणे वावरतो आणि मग पुढे जे जे घडते ते त्याची वातावरणनिर्मिती - लेखक आपल्याला त्याच्याबरोबर त्या कथेची सफर घडवून आणतो. या तीनही कथांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, लेखकाने आवश्यक तितकीच पात्रे कथानकात आणली आहेत. कथानक रंजक बनवण्यासाठी स्त्री-पुरुष संबंधांची जोड न घेता देखील त्यांनी आपल्या कथा वाचनीय केल्या आहेत, आवश्यक तिथे कथानकाच्या गरजेपुरता या स्त्री-व्यक्तिरेखा येऊन जातात. पण, मूळ कथानक भरकटू देत नाहीत; हे लेखकाचे आणि त्यांच्या ‘अर्ध्या माणसाची अर्धी गोष्ट’ या पुस्तकाचे यश म्हणावे लागेल.



पुस्तकाचे नाव : अर्ध्या माणसाची अर्धी गोष्ट
पुस्तकाचे लेखक : सागर कुलकर्णी
प्रकाशन : राजेंद्र प्रकाशन
मूल्य : 200
पृष्ठसंख्या : 164



 - वेदश्री दवणे 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121