समृद्धी महामार्ग मेहकर मार्गाखालून पाण्याचा प्रवाह, सुरक्षितेतच्या कारणावरून दिड तास मार्गावर वाहतूक बंद समृध्दी महामार्गाच्या ‘मेन कॅरेज वे’वर कोठेही पाणी आलं नाही
नागपूर, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर परिसरात दि.२५ जूनच्या संध्याकाळपासून सुरु झालेल्या पावसाचा फटका समृद्धी महामार्गालाही बसला. मेहकर जवळून जाणाऱ्या समृद्धीच्या पुलाखाली राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने व रस्त्यावरून नदी सारखा प्रवाह वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेबाबत समृद्धी महामार्ग प्रशासनाने महत्वाची माहिती दिली आहे.
हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गचे (समृद्धी महामार्ग) अधिक्षक अभियंता तथा प्रकल्प संचालक, शिबीर कार्यालय अमरावती यांनी या घटनेबाबत स्पष्टिकरण दिले आहे. त्यानुसार समृद्धीवरील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे पाणी साचलेबाबतची सद्यस्थिती पुढे आली आहे. त्यानुसार समृध्दी महामार्ग व खामगाव कडून मेहकर कडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ सी, समृध्दी महामार्गास मेहकर इंटरचेंज येथे मिळतो. राष्ट्रीय महामार्ग हा समृद्धी महामार्गाच्या खालून जातो. समृध्दी महामार्ग हा वरच्या भागास आहे.
राष्ट्रीय महामार्ग हा समृध्दी महामार्गाच्या खालून जातो. समृध्दी महामार्ग हा वरच्या भागास आहे. २५ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजतापासून २६ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजतापर्यंत येथे सतत पाऊस पडून अतिवृष्टी झाली. या काळात येथे साधारणत: १०७ मीमी (अंदाजे) पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे खामगावकडून मेहकरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरची साधारणतः २०० मीटर लांबी १ ते दीड तास पाण्याखाली होती.
राष्ट्रीय महामार्गाकडून समृद्धी महामार्गास जोडणाऱ्या रॅम्पवर पाणी आलेले होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक एक ते दीड तास प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी बंद करण्यात आलेली होती. त्यानंतर प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्गावरील मेहकर इंटरचेंज येथील पाणी निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळेच एक ते दीड तासातच या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यात आली. समृध्दी महामार्गाच्या ‘मेन कॅरेज वे’वर कोठेही पाणी आलेले नव्हते.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.