मुंबई :मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. अशातच आता गुजरातमधील कामे पूर्णत्वाकडे आहेत तर महाराष्ट्रातील कामांनाही गती आहे. अशातच लार्सन अँड टुब्रो ला ५०८.१७ किमी लांबीच्या मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या ट्रॅक वर्क पॅकेज टी-१ साठी सर्वात कमी बोली लावणारा कंपनी म्हणून घोषित करण्यात आले. पॅकेज टी-१ हे महाराष्ट्रातील ट्रॅक स्लॅब बांधणीचे काम असणार आहे. आणि हे या प्रकल्पातील अंतिम ट्रॅक इन्स्टॉलेशन पॅकेजही आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील भारताच्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) द्वारे पॅकेज टी-१ हे भारतातील पहिल्या हाय स्पीड रेल लाईनचे तिसरे आणि अंतिम ट्रॅक इंस्टॉलेशन संबंधित पॅकेज आहे. हा ट्रॅक मुंबई आणि अहमदाबादला १२ स्थानकांद्वारे जोडेल आणि त्याची किंमत अंदाजे १.१ लाख कोटी रुपये (यूएस $१५ अब्ज) आहे. पॅकेज टी-१ची व्याप्ती १.२८ किमी पॅकेज सी-१ म्हणजेच मुंबईतील निर्माणाधीन भूमिगत बीकेसी स्टेशन, २०.३७७ किमी पॅकेज सी-२मधील अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे भूमिगत बोगदा आणि १३५.४५ किमी पॅकेज सी-३मध्ये लार्सन अँड टुब्रोद्वारे निर्मित उन्नत रेल्वेमार्ग आणि ३ स्थानके येथील ट्रॅक कामाशी संबंधित आहे.
एनएचएसआरसीएलने ऑक्टोबर २०२४मध्ये या करारासाठी २१५७ दिवस (५.९ वर्षे) अंतिम मुदत आणि अज्ञात अंदाजासह निविदा मागवल्या होत्या. मे महिन्यात तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या. यावेळी तीन कंपन्या स्पर्धेत होत्या. त्यापैकी एक निविदा अनुपालन न करणारी आढळली आणि नंतर अपात्र ठरवण्यात आली. त्यामुळे दोन कंपन्यांमध्ये ही स्पर्धा झाली ज्यात सर्वात कमी बोलीवर म्हणून एल अँड टी या कंपनीने निविदा जिंकली.
कामाची व्याप्ती
पॅकेज क्रमांक - महाराष्ट्र हायस्पीड रेल्वे - टी १
संक्षिप्त व्याप्ती: मुंबई स्थानक वांद्रे-कुर्ला संकुल आणि झारोली गाव दरम्यान हाय स्पीड रेल्वेसाठी दुहेरी मार्गिका डिझाइन, बांधणी, चाचणी आणि कार्यान्वित करणे यासह ट्रॅक कामांचे डिझाइन, पुरवठा आणि बांधकाम करणे यांचा समावेश आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मुख्य रेल्वे मार्गांमध्ये आढळणाऱ्या पारंपारिक बॅलेस्टेड ट्रॅक सिस्टम ऐवजी एक विशेष स्लॅब ट्रॅक सिस्टम वापरली जात आहे. जपानी जे-स्लॅब ट्रॅक सिस्टम म्हणून ओळखली जाते. ऑक्टोबर २०२३ मध्ये L&T ने गुजरातमधील आणंद येथे त्यांची विशेष हाय-स्पीड रेल ट्रॅक स्लॅब मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरु केली होती.
एकूण मार्गातील ट्रॅकची स्थिती
पॅकेज स्थिती
टी-१ (महाराष्ट्र): (१५६.८५५ किमी)
बीकेसी/मुंबई येथील हायस्पीड रेल्वे स्टेशन ते सीमेवरील झरोली गावादरम्यान ट्रॅक आणि ट्रॅकशी संबंधित कामांचे डिझाइन, पुरवठा आणि बांधकाम- एल अँड टी सर्वात कमी बोलीदार
टी-२ (गुजरात): (२३७.१० किमी)
झरोली गाव आणि वडोदरा दरम्यान ट्रॅक आणि ट्रॅकशी संबंधित कामांचे डिझाइन, पुरवठा आणि बांधकाम - आयआरकॉन इंटरनॅशनलद्वारे काम सुरू
टी-३ (गुजरात): (११४.६० किमी)
वडोदरा आणि साबरमती डेपो आणि कार्यशाळा दरम्यान ट्रॅक आणि ट्रॅकशी संबंधित कामांचे डिझाइन, पुरवठा आणि बांधकाम - लार्सन अँड टुब्रोद्वारे काम सुरु