ॲपवर आधारित सेवा देणाऱ्यांना कायद्याचे पालन करावेच लागणार

Total Views | 8

मुंबई : राज्यातील ॲपवर आधारित बसेस,कार, बाईक टॅक्सी यांनी राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. खाजगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बसेस,कार, बाईक टॅक्सी यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

विधानभवन येथे ॲपवर आधारित बसेस,कार, बाईक टॅक्सी च्या विविध विषयासंदर्भात बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते.यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यासह परिवहन विभागाचे इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्य शासन नेहमीच या क्षेत्रात होणा-या सकारात्मक बदलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ देत आले आहे. कोणत्याही ॲपवर आधारित बसेस,कार , बाईक टॅक्सी यांनी कायदेशीर बाबींचे पालन करूनच वाहतूक व्यवसाय केला पाहिजे.राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर शासन कडक कारवाई करेल. ॲपवर आधारित बसेस,कार, बाईक टॅक्सी यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. अर्थात, शासनाने बनविलेले नियम हे प्रवाशांच्या हिताचे असल्यामुळे त्यांच्या हिताचे संरक्षण होणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121