भारत गौरव ट्रेनची अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण यात्रा ; मडगावहून अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रेबाबत

Total Views | 10

मुंबई
: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड भारत गौरव रेल्वेद्वारे 'अष्ट ज्योतिर्लिंग' या श्रावण विशेष यात्रेला सुरुवात करणार आहे.एकूण १३ दिवसांच्या दौऱ्यामध्ये द्वारका (नागेश्वर), सोमनाथ, उज्जैन (महाकालेश्वर), ओंकारेश्वर, नाशिक (त्र्यंबकेश्वर), औरंगाबाद (घृष्णेश्वर), परभणी (परळी वैज्यनाथ) आणि मल्कापुर्लीस (मल्कापुर्लम) या आठ ज्योतिर्लिंग मंदिरांचा समावेश असेल.

आयआरसीटीसी, पश्चिम क्षेत्र मुंबईचे जनसंपर्क अधिकारी डॉ.ए.के.सिंग आणि कोकण रेल्वेचे पीआरओ,मडगाव बबन घाटगे यांनी दि. ९ जुलै २०२५ रोजी मडगाव येथे प्रसारमाध्यमांना संबोधित करताना यासंबंधित माहिती दिली. प्रवाशांना मडगाव, थिविम, सावंतवाडी, कुडाळ, वैभववाडी, राजापूर रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा पेन आणि पनवेल स्थानकांवर चढू किंवा उतरू शकतात.

डॉ. सिंह यांनी असेही सांगितले की, हे पॅकेज कुटुंब, गट आणि एकट्या प्रवाशांना ज्योतिर्लिंगाच्या सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांना एक अखंड आणि परवडणारा पर्याय उपलब्ध करून देते. भारत गौरव ट्रेनचा बाह्य भाग लोकप्रिय भारतीय स्मारके, शिल्पे, लँडमार्क आणि नृत्य प्रकार इत्यादी दर्शवितो आणि त्यांची एकूण क्षमता सुमारे ६००-७०० आसन क्षमता आहे. त्यामध्ये इन्फोटेनमेंट सिस्टिमॅटिक आणि सीसीटीव्ही कॅमेरे आणि ताजे जेवण तयार करण्यासाठी सुसज्ज पेंट्री कार बसवण्यात आली आहे.

अष्ट ज्योतिर्लिंगाचा हा दौरा ०५ ऑगस्ट रोजी मडगावहून सुरु होईल. या दौऱ्याचे पॅकेज अंदाजे इकॉनॉमी (स्लीपर) साठी प्रति व्यक्ती २३८८०/- रुपये, स्टँडर्ड (३एसी) साठी प्रति व्यक्ती ४१०६० रुपये आणि कम्फर्ट (सेकंड एसी) साठी प्रति व्यक्ती ५४६६० रुपये इतके असेल. ज्यामध्ये बसमधून प्रवास आणि सहली, हॉटेलमध्ये मुक्काम, टूर गाईड, जेवण, प्रवास विमा इत्यादी सेवांसह आरामदायी रेल्वे प्रवास आणि संबंधित ऑनबोर्ड सेवा प्रदान केल्या जातात. याबाबतची अधिक माहितीसाठी अधिकृत आयआरसीटीसी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121