नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान युद्धाला तोंड फोडणाऱ्या लष्करप्रमुख आसीफ मुनीरला ताब्यात घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालविण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताने पहलगाम हल्ल्याच्या बदमला म्हणून ऑपरेशन सिंदूर राबविले होते. त्याला पाकिस्तानी सैन्याने प्रत्युत्तर म्हणून पूंछ भागात निष्पाप भारतीयांवर गोळीबार केला. दरम्यान शमशाद मिरजा हे पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख असणार आहेत, अशाही चर्चा सुरू आहेत. इम्रान खानची सुटका करावी, अशी मागणी पाकिस्तानात केली जात आहे. पाकिस्तानचे तुरुंग फोडण्याची तयारीही त्याने केल्याचे वृत्त येत आहे.
कराचीमध्ये पाकिस्तानी सैन्यावर बलोच आर्मीने गोळीबार केल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानातील पेशावरमध्ये स्फोटांचा मोठा आवाज होत असल्याची माहिती आहे. कराची, लाहोरमध्ये मोठी कारवाई सुरू असल्याचेही प्रार्थमिक वृत्त आहे. कराचीत ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. पाकिस्तानात प्रचंड तणावाची स्थिती असल्याची माहिती आहे. पाकिस्तानची चारही बाजूंना कोंडी होताना दिसत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पाकिस्तानवर लष्करप्रमुखांची उचलबांगडी करण्याची नाचक्की झालेली आहे. त्यात सरकार आणि पाकिस्तानी लष्कर आमने सामने आल्याची माहिती आहे.
इस्लामाबाद-कराचीमध्ये भारताने ड्रोन हल्ल्याद्वारे पाकिस्तान खडबडून जागा झाला आहे. प्रचंड गदारोळात पाकिस्तानमध्ये सायरन वाजवण्याची ब्लॅकआऊटची प्रक्रिया सुरू झाली आहे. पाकने केलेल्या आगळीतचेला प्रचंड मोठे उत्तर देण्यात आलेले आहे. भारताच्या संरक्षण शस्त्रतेला ओळखण्यात पाकिस्तानने केलेली चूक पाकिस्तानला महागात पडू शकते. भारताने आकाश, जमीन आणि जल, अशा तिन्ही बाजूने घेरलेले आहे. पाकिस्तानला भारताच्या नौदल, हवाई दल आणि सैन्यदलाने चांगलेच कोंडीत पकडलेले आहे.
दिल्लीत इंडिया गेटवर सर्वांना बाजूला केले
पाकिस्तानच्या कुरापती पहाता भारत सरकारने खबरदारी घेण्याची सुरुवात केली आहे. इंडिया गेटहून सर्वांना ठिकाण सोडून जाण्यासाठी निर्देश देण्यात आले. दि. ९ मे रोजी मध्यरात्री स्थानिका पोलीसांनी ही कारवाई सुरू केली. भारतीय वायूदलाचे तळ काहीच अंतरावर असल्याने ही खबरदारी घेण्यात येत आहे. एक दिवस आधी पाकिस्तानने भारताच्या एकूण १५ ठिकाणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता.