मुंबई - ( Nancy ST depot in the east part of Borivali ) भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या एस टी महामंडळाच्या बोरिवलीच्या पूर्व भागातील नँन्सी एसटी डेपोच्या प्रवासी निवारा व नियंत्रण कक्षाचे १० मे, २०२५ ला सायंकाळी ८.०० वाजता केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याची माहिती दरेकर यांनी दिली आहे.
या उदघाटन सोहळ्याला उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाश सुर्वे, चारकोप विधानसभा क्षेत्राचे आ. योगेश सागर, कांदिवली क्षेत्राचे आ. अतुल भातखळकर, दहिसर विधानसभा क्षेत्राच्या आ. मनीषा चौधरी, विधान परिषदेचे माजी आ. भाई गिरकर, बोरिवली विधानसभा क्षेत्राचे माजी आ. सुनील राणे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, मागाठाणे मंडळ अध्यक्ष (उत्तर) अमित उतेकर, मागाठाणे मंडळ अध्यक्षा (मध्य) सोनाली नखुरे, मागाठाणे मंडळ अध्यक्ष (दक्षिण) अविनाश राय यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.