मोठी बातमी! सुरक्षेच्या कारणास्तव १६ विमानतळांवरील उड्डाण बंद!

    07-May-2025
Total Views | 21
मोठी बातमी! सुरक्षेच्या कारणास्तव १६ विमानतळांवरील उड्डाण बंद!


नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी करण्यात आले आहे. मात्र, आता पाकिस्तानच्या लष्कराला मोकळीक देण्याचा निर्णय तिथल्या सरकारांनी घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील काही विमानतळे पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर काही तासांतच, ७ मे रोजी भारत सरकारने देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील किमान १६ विमानतळ नागरिकांच्या हालचालींसाठी बंद केले आहेत.


16 विमानतळांमध्ये लेह, थॉइस, श्रीनगर, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, जामनगर, भटिंडा, भुज, धर्मशाला, शिमला, राजकोट आणि पोरबंदर यांचा समावेश आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांनी ७ ते १० मे दरम्यान प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना इशारा देण्यास सुरुवात केली आहे व भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की, हवाई क्षेत्रावरील निर्बंधांबाबत सरकारी अधिसूचनेमुळे, अनेक विमानतळांवरून (अमृतसर, बिकानेर, चंदीगड, धर्मशाळा, ग्वाल्हेर, जम्मू, जोधपूर, किशनगड, लेह, राजकोट आणि श्रीनगर) १६५ हून अधिक इंडिगो उड्डाणे १० मे २०२५ रोजी सकाळी ५२९ वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121