चौंडी परिसराच्या विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूतगिरणी आणि रस्त्यांचे भूमिपूजन

    06-May-2025
Total Views | 7

development of the spinning mill and roads 
 
अहिल्यानगर: (development of the spinning mill and roads) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौंडी (जामखेड, अहिल्यानगर) येथे दोन महत्त्वाच्या कामांचे भूमिपूजन झाले. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन यांचा समावेश आहे.
 
सूतगिरणीसाठी शासनाने ₹९१ कोटींचा निधी दिला आहे. या गिरणीमुळे स्थानिकांना रोजगार आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. तर चौंडी ते निमगाव डाकू या २.७ किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरणासाठी ₹३  कोटी ९४ लाखांचा खर्च केला जाणार आहे. या रस्त्यामुळे परिसरातील दळणवळण सुलभ होईल. या रस्त्यावरच सूतगिरणी असल्यानं या मार्गाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरणासोबतच देखभाल-दुरुस्तीसाठी पुढील पाच वर्षांसाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे.
 
भूमिपूजन प्रसंगी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, मंत्री संजय सावकारे, मंत्री भरत गोगावले आदी उपस्थित होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121