व्हर्च्युअल गॅलॅक्सी इन्फोटेक कंपनीने डिजिटल इंडिया साकारण्यात योगदान द्यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    21-May-2025
Total Views | 10
 
Chief Minister Devendra Fadnavis on Virtual Galaxy Infotech Company should contribute to realizing Digital India
 
मुंबई: (Chief Minister Devendra Fadnavis on Virtual Galaxy Infotech Company should contribute to realizing Digital India) डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी व्हर्च्युअल गॅलॅक्सी इन्फोटेक लिमिटेड कंपनीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वर्षा निवास्थान येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक लिमिटेडच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील लिस्टिंग झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष आशुतोष घोलप उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सन १९९७ मध्ये व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक कंपनीची सुरुवात नागपूरमध्ये अविनाश शेंडे आणि सचिन पांडे यांनी केली. छोट्या स्वरूपात सुरू झालेली ही कंपनी भारताच्या आयटी क्षेत्रात एक मोठी शक्ति बनली आहे, याचा अवघ्या महाराष्ट्राला अभिमान आहे.
 
कंपनीची देशात १६ ठिकाणी व विदेशात तीन ठिकाणी कार्यालये आहेत. या कंपनीला मिहान (नागपूर) येथील येथे १० एकर जागा मिळाली असून येथील मोठ्या प्रमाणात उद्योग विकास होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अविनाश आणि सचिनसारख्या तज्ज्ञ व्यक्तींनी त्यांची स्वप्ने साकार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा प्रवास राज्यातील हजारो उद्योजकांना मोठी स्वप्ने पाहण्याची, धाडसीपणे काम करण्याची करण्याची प्रेरणा देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी कंपनीच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121