आषाढीनिमित्त राज्यभरातील वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या विशेष ८० रेल्वे गाड्या

    12-Jun-2025
Total Views |
 
80 special trains of Central Railway occasion on Ashadhi
 
मुंबई: विठूराच्या भेटीची आस लागलेल्या लाखो वारकऱ्यांची पाऊले आता पंढरपूरच्या दिशेने वळली आहेत. अशावेळी आषाढी वारीनिमित्त राज्यभरातील वारकऱ्यांसाठी विशेष ८० रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.
 
आषाढी एकादशीनिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गगुरु तुकाराम महाराज यांच्यासह विविध संताच्या दिंड्या मजलदरमजल करीत पंढरीच्या दिशेने जात आहेत. आषाढीनिमित्त वैष्णवांचा मेळा श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये जमतो. हे पाहता वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या यात्रेकरिता मध्य रेल्वेकडून विशेष ८० रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. ही रेल्वे सेवा १ जुलै ते १० जुलै या कालावधीत पंढरपूर आणि मिरजसाठी सुरु राहणार आहे. त्यापैकी काही फेऱ्या मिरज - पंढरपूरदरम्यान व लातूर - पंढरपूर, खामगाव - पंढरपूर, अमरावती - पंढरपूर, नागपूर - पंढरपूर, भुसावळ - पंढरपूर दरम्यान उर्वरित फेऱ्या होणार आहेत.
 
१. नागपूर-मिरज विशेष गाड्या (४ सेवा)
 
ट्रेन क्रमांक ०१२०५ विशेष गाड्या नागपूर येथून दिनांक ४ जुलै आणि दि. ५ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01206 विशेष गाड्या दि.५ आणि दि.०६ रोजी दुपारी १२.५५ वाजता मिरज येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल. या गाडीला अजनी, वर्धा, पुलगांव, धामणगाव, चांदुर, बडनेरा, मुर्तिजापुर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव,जत रोड, ढालगाव, कवठे महाकाळ, सलगरे आणि अरग येथे थांबे असतील.
 
२. नवीन अमरावती-पंढरपूर विशेष (४ सेवा)
 
ट्रेन क्रमांक 01119 विशेष नवीन अमरावती येथून दि. २ जुलै आणि दि.५ जुलै रोजी २.४० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११२० विशेष गाडी दि.३ जुलै आणि दि.६ रोजी पंढरपूर येथून ७.३० वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १२.५० वाजता नवीन पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मुर्तिजापुर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे थांबे असतील.
 
३. खामगाव-पंढरपूर विशेष (४ सेवा)
 
ट्रेन क्रमांक 01121 विशेष गाड्या दि ३ आणि दि. ६ जुलै रोजी खामगाव येथून सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01122 विशेष गाड्या दि. ४ आणि दि.७ जुलै रोजी पहाटे ५ वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि खामगाव येथे त्याच दिवशी संध्याकाळी ७.३० वाजता पोहोचेल. जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी
 
४. भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष (२ सेवा)
 
ट्रेन क्रमांक 01159 अनारक्षित विशेष दि. ०५ जुलै रोजी भुसावळ येथून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01160 अनारक्षित विशेष गाडी दिनांक ०६ जुलैरात्री १०.३० वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.०० वाजता पोहोचेल. जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगांव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी येथे या गाडीला थांबे असतील.
 
५. लातूर-पंढरपूर अनारक्षित विशेष गाड्या (१० सेवा)
 
ट्रेन क्रमांक 01101 अनारक्षित विशेष गाड्या दिनांक ०२, ०४, ०७, ०८ आणि ०९ जुलै रोजी लातूर येथून सकाळी ७.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी दुपारी १२.५० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01102 अनारक्षित विशेष गाड्या दिनांक ०२, ४, ७, ०८ आणि ०९ जुलै रोजी दुपारी १.५० वाजता पंढरपूर येथून सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी संध्याकाळी ७.२० वाजता पोहोचेल. या गाडीला हरंगुळ, औसा रोड, मुरुड (डी), ढोकी, कळंब रोड (डी), येडशी, धाराशिव (उस्मानाबाद), पांगरी, बार्सी टाउन, शेंद्री, कुर्डुवाडी आणि मोडलिंब थांबे असतील.
 
६. मिरज-कालबुरगि अनारक्षित विशेष गाड्या (२० सेवा)
 
ट्रेन क्रमांक ०११०७ अनारक्षित विशेष गाड्या दि. ०१ ते १० जुलैपर्यंत मिरज येथून सकाळी ५.०० वाजता सुटेल आणि कलबुरगि येथे त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक ०११०८ अनारक्षित विशेष गाड्या दि.०१ ते दिनांक १० जुलै पर्यंत दुपारी ०३.३० वाजता कलबुरगि येथून सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी रात्री ११.५० वाजता पोहोचेल. या गाडीला अरग, बेळंकी, सलगरे, कवठे महाकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळे, वासूद, सांगोला, पंढरपूर, मोडलिंब (फक्त ट्रेन क्रमांक 01108 साठी), कुर्डुवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट, दुधनी आणि गंगापुर इत्यादी थांबे असतील.
 
७. कोल्हापूर-कुर्डुवाडी अनारक्षित विशेष गाड्या (२० सेवा)
 
ट्रेन क्रमांक 01209 अनारक्षित विशेष गाड्या दिनांक ०१ ते दिनांक १० जुलैपर्यंत कोल्हापूर येथून सकाळी ६.१० वाजता सुटेल आणि कुर्डुवाडी येथे त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01210 अनारक्षित विशेष गाडी दि. १ ते दि. १० जुलैपर्यंत दुपारी ४.३० वाजता कुर्डुवाडी येथून सुटेल आणि कोल्हापूर येथे त्याच दिवशी रात्री १०.३० वाजता पोहोचेल. थांबे : हातकणंगले, जयसिंगपुर, मिरज, अरग, बेळंकी, सलगरे, कवठे महाकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळे, वासूद, सांगोला, पंढरपूर आणि मोडलिंब
 
८. पुणे-मिरज अनारक्षित विशेष गाड्या (१६ सेवा)
 
ट्रेन क्रमांक ०१२०७ अनारक्षित विशेष गाड्या दिनांक ३.७.२०२५ ते दिनांक १०.७.२०२५ पर्यंत पुणे येथून सकाळी ८.४० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१२०८ अनारक्षित विशेष गाड्या दिनांक ३ ते दि.१० जुलै पर्यंत मिरज येथून सायंकाळी ७.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ४.३० वाजता पोहोचेल. हडपसर, उरुळी, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, वासूद, जावळे, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, लंगरपेठ, कवठे महाकाळ, सलगरे, बेळंकी आणि अरग थांबे असतील.