विधान परिषद आश्वासन समितीच्या समिती प्रमुख पदाचा प्रवीण दरेकरांनी स्वीकारला पदभार

    06-May-2025
Total Views | 11

Praveen Darekar takes charge as Committee Head of the Legislative Council Committee
 
मुंबई- (Praveen Darekar takes charge as Committee Head of the Legislative Council  Committee) विधानमंडळाच्या महत्वाच्या विधान परिषद आश्वासन समितीच्या समिती प्रमुख पदाचा आ. प्रवीण दरेकरांनी आज विधानभवन येथे जाऊन पदभार स्वीकारला.
 
विधान परिषदेच्या सभापतींनी नुकतीच विधानमंडळाच्या विविध समित्यांवर सदस्यांची नामनियुक्ती केली होती. विधान परिषदेचे गटनेते असलेल्या प्रवीण दरेकरांना महत्वाच्या विधान परिषद आश्वासन समितीवर समिती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी विधीमंडळाचे अवर सचिव (समिती) सुरेश मोगल व अन्य सहकारी अधिकारी उपस्थित होते.
 
सन २००३ पासूनच्या प्रलंबित आश्वासनांचा यावेळी प्रवीण दरेकरांनी आढावा घेतला व अधिकाऱ्यांना आश्वासनांवरील चर्चेसाठी प्राधान्यक्रम ठरविण्याच्या सूचना दिल्या.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121