मुंबई शिक्षक विकास मंडळाचे महायुवा संमेलन उत्साहात संपन्न!

आमदार प्रविण दरेकर यांच्याकडून आयोजक विशाल कडणे यांचे कौतुक

    29-May-2025
Total Views | 7

Untitled design (11)

मुंबई : मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात दि. २८ मे रोजी मुंबई शहर शिक्षक मंडळाचे महायुवा संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रमात आमदार प्रवीण दरेकर यांनी युवा शिक्षकांना मार्गदर्शन केले. या महासंमेलनात १६०० हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षकांच्या विविध समस्या, मार्गदर्शनपार सत्रांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांच्या मार्गदर्शनातून साकारलेल्या या महायुवा संमेलनाचे आयोजन मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे कार्यकारिणी सदस्य विशाल कडणे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

शिक्षण हा देशाच्या व्यवस्थेचा मुख्य कणा असून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन आमदार प्रविण दरेकर यांनी केले. सदर कार्यक्रमांमध्ये शिक्षकांच्या दैनंदिन जीवनचर्येमधील विविध प्रश्न, समायोजनाबाबतचे प्रश्न, वेतन, भत्ते, राष्ट्रीय शिक्षण धोरण इत्यादी बाबतीत सखोल चर्चा झाली. शिक्षक बांधवांसोबत आम्ही सदैव उभे आहोत आणि त्यांच्या प्रत्येक समस्येला शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचे प्रामाणिक वचन मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे कार्यकारणी सदस्य विशाल कडणे यांनी दिले. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी आणि नंतर सेवेत रुजू झालेलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्ववत जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, नेमलेल्या अभ्यासगटाने केलेल्या दि. ८५-२०२० च्या शिफारिशी मान्छ करून शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १०-२०-३० वर्षांची आश्वासित प्रगति योजना तात्काळ लागू करावी, शिक्षकांसाठी कॅशलेस मेडीक्लेम योजना लागू करावी, जाचक अटी रद्द करून सामान्य व तांत्रिक शाळांचे सर्व पात्र शिक्षकांना सरसकट निवडवेतनश्रेणी मान्य करावी, मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागात मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरणे, मुंबई महानगर पालिका माध्यमिक शिक्षण विभागात १ नोव्हेंबर २००५ नंतर नेमणूक झालेल्या सर्व शिक्षकांचे भविष्य निर्वाहनिधीचे खाते सुरु करून त्यांना तात्काळ डी.सी.१ लागू करावी, प्रत्येक शाळेत कला, क्रीडा व संगीत शिक्षकांची पदे पूर्वीप्रमाणे पुनर्स्थापित करावी, समुपदेशकांना शाळेत समुपदेशक पद देऊन त्यांना पूर्वीप्रमाणे वेतनवाढ मिळावी, रात्र - शाळांना पूर्ण वेळ शाळेचा दर्जा मिळावा व मुख्याध्यापकांप्रमाणे लिपिक व शिपाई पद पूर्ण वेळ करण्यात यावे, अशासकीय अनुदानित सामान्य व तांत्रिक शाळांमधील शिक्षकांचे सेवानिवृतीवेतनाचे प्रस्ताव रिकव्हरी किंवा तत्सम कारणावरून प्रलंबित न ठेवता कमाल एक महिन्याच्या आत मान्य करण्यासंबधीचे कायम स्वरूपाचे शासन आदेश निर्गमित व्हावे, वर्ग ६ ते ८ ला शिकवणाऱ्या सर्व प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी. सदर अधिवेशनात श्याम सावंत, गजानन रत्नपारखी, पराग शैक्षणिक संकुलाचे संचालक बाळकृष्ण बने शेठ, विजय कडणे, राजेश सातघरे, संजय पितळे, मनीष शाह, मंगल शाह, शिवम सिंह विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

darekar 1

युवा पिढीवर चांगले संस्कार करणे अत्यंत महत्वाचे! : आमदार प्रवीण दरेकर 
मुंबई शहर शिक्षक मंडळाच्या महायुवा संमेलनात युवा शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की " शिक्षक मंडळाच्या माध्यमातून शिक्षकांना एकत्र आणण्याचे काम आज या ठिकाणी होत आहे. मुंबई शहर शिक्षक मंडळाचे मी मनापासून अभिनंदन करतो, विशाल कडणे सामाजिक क्षेत्रात, सहकार क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. आपण समाजात काम करत असताना युवा पिढीवर चांगले संस्कार झाले पाहिजेत, आपली संस्कृती, आपली परंपरा यापासून ते दूर जाता कामा नये अशा प्रकारची काळजी घेत, युवा पिढीला सुसंस्कृत करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी निश्चित हे महासंमेलन उपयुक्त ठरेल. आपला धर्म आपल्या परंपरा आपल्या चालीरीती त्यांना माहित व्हाव्यात, इथल्या मातीशी नाळ त्यांची जोडली जावी यासाठी विशाल कडणे आणि त्यांचे सर्व सहकारी मेहनत घेतायेत त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो या युवा संमेलनाच्या माध्यमातून युवाना चांगलं मार्गदर्शन होईल, त्यांच्यावर चांगले संस्कार होतील अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे."

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121