मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bajrangdal Karyakarta Death) बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना कर्नाटकच्या मंगळूर येथे उघडकीस आली आहे. सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या हत्येशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येतेय की, काही लोक धारदार शस्त्राने एका व्यक्तीवर वारंवार हल्ला करत आहेत. सुहास शेट्टी असे या मृत कार्यकर्त्याचे नाव असून पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे वाचलंत का? : आगामी जनगणनेसोबत एनआरसी देखील आवश्यक!
मंगळुरूमधील वातावरण चिघळण्याच्या शंकेने पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले की सुहासवर फैजल नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप आहे. भाजप कार्यकर्ते प्रवीण नेत्रौ यांची हत्या केल्याचा फैजलवर आरोप होता. अशी माहिती आहे की त्यानंतर फैजलची हत्या करण्यात आली होती. सध्या एनआयए प्रवीण नेत्रौसंबंधित प्रकरणाचा तपास करीत आहेत. सुहास शेट्टी यांच्या हत्येनंतर, मंगळुरूमध्ये दि. ६ मे पर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटवली असून त्यांना लवकरच अटक करण्याचा दावा करण्यात आला आहे.