महत्वाची बातमी! आज रात्री ८ वाजता PM मोदी देशाला संबोधित करणार
12-May-2025
Total Views | 8
मुंबई : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री (सोमवार, १२ मे) ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच अधिकृतरित्या बोलणार असल्याने ते नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ७ मे रोजी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला असून यात जवळपास १०० दहशतवादी ठार मारले गेलेत.
त्यामुळे सध्या दोन्ही देशात तणावपूर्ण परिस्थिती आहे. दरम्यान, शनिवारी रात्री दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली. ऑपरेशन सिंदूरनंतर आता प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. याआधीही पुलवामा हल्ला, नोटबंदी, चांद्रयान ३ मध्ये मिळालेले यश यासारख्या महत्वाच्या प्रसंगी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले होते.
दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूरशी संबंधित काही माहिती देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय बोलतात याकडे देशासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.