महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई तर्फे स्पर्धांचे आयोजन

    03-Jan-2025
Total Views |

image
मुंबई : महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई तर्फे बालकांमधील प्रतिभेस प्रोत्साहन देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत बालनाटिका स्पर्धा आणि शास्त्रीय नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या दोन्ही स्पर्धा इयत्ता पहिली ते सहावी आणि इयत्ता सातवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये होणार आहेत. इयत्ता पहिली ते सहावी या गटाची बालनाटिका स्पर्धा ३० जानेवारी रोजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ६ या वेळेत आणि इयत्ता सातवी ते दहावी या गटाची बालनाटिका स्पर्धा ३० जानेवारी रोजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. इयत्ता पहिली ते सहावी या शास्त्रीय नृत्य स्पर्धा स्पर्धा ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ६ या वेळेत आणि इयत्ता सातवी ते दहावी या गटाची शास्त्रीय नृत्य स्पर्धा ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख २२ जानेवारी आहे.