कट्टरपंथीयांचा गोरक्षकावर जीवघेणा हल्ला

गोमांस तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल

    24-Jan-2025
Total Views | 82

Gujrat
 
गांधीनगर : गुजरातमधील (Gujrat) अहमदाबादमध्ये एका गोरक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्याआधी त्यांने गोमांस तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. गोमांस पकडण्याचा प्रयत्न केल्याने आपल्यावर हल्ला करण्यात आला, अशी पीडित गोरक्षकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गोरक्षकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात मोहम्मद हुसेनसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
वृत्तानुसार, करंज पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लाल दरवाजा परिसरात गोरक्षकांवर हल्ल्या केल्याची घटना घडली. गोरक्षक मनोज बारिया यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशीच सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो एका युवतीसोबत एका चित्रपटगृहाबाहेर उभा होता. दरम्यान तोंड लपवून चार ते पाच जणांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी आणि काठ्यांनी हल्ला केला.
 
दरम्यान, पीडित व्यक्तीला त्याच्या आवाजावरून हल्लेखोरांपैकी एकाची ओळख पटली होती. त्याचे नाव मोहम्मद हुसैन उर्फ लाईट उस्मान घांची असे आहे. तीन महिन्यांपूर्वी मनोज बारिया यांनी हुसेन आणि त्याच्या साथीदाराविरोधात गांधीनगरमध्ये गोमांस प्रकरणी तक्रार दाखल केली होती. याच घटनेच्या वैमनस्यातून हुसेन आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोरक्षक मनोजवर हल्ला केला असल्याचा आरोप आहे.
 
 
 
संबंधित हल्ल्यामध्ये कट्टरपंथी मोहम्मद वसीम कुरेशी, मुबीन खान पठाण आणि अन्य दोघांचा समावेश असल्याची माहिती समोर आली. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती आले आहेत. आरोपींनी तोंडाला मुसक्या बांधत गोरक्षावर कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना अटक करण्यात आली आहे.
 
एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, आयपीसीच्या कलम १८९(२),१९१(२), १९१(३), १९०, ११५ (२), ११८ (१)आणि गुजरात पोलीस कायद्याच्या कलम १३५ (१) अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्याय या मूल्याला कृतीत उतरवण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांना विधायक वळण देण्यासाठी ज्यांनी जनमानसाशी थेट संवाद ठेवला, अशा आ. अमित गोरखे यांना २०२५ सालच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून पहिल्यांदाच कामकाज पाहण्याची संधी मिळाली. या विशेष अनुभवाबरोबरच त्यांनी ‘सरकारची भूमिका’, ‘उपवर्गीकरणाचा मुद्दा’, ‘अस्पृश्यतेचे प्रश्न’, ‘धर्मांतरविरोधी धोरण’ आणि ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ यांसारख्या संवेदनशील विषयांवर अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. दै. ‘मुंबई तरुण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121