'नाट्यशास्त्र' ग्रंथांची ओळख करून देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन

    09-Sep-2024
Total Views |


natyashastra 
पुणे : स्नेह पुणे संचलित आचार्य भरतमुनी गुरुकुल तर्फे ऑनलाइन नाट्यशास्त्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. भरतमुनी लिखित नाट्यशास्त्र हा नाट्यक्षेत्रातील एक महत्वाचा आणि मानाचा ग्रंथ आहे. भरतमुनींनी १५००- २००० वर्षांपूर्वी लिहिलेला हा ग्रंथ आजही चर्चेत आहे. नाट्यशास्त्राचा अभ्यास आणि चर्चा करताना या ग्रंथाचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. हा ग्रंथ इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही का चर्चेत आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि 'नाट्यशास्त्र' ग्रंथांची ओळख करून देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ते २९ सप्टेंबर या कालावधीत रोज रात्री ८ ते ९ या वेळेत ऑनलाइन पद्धतीने ही कार्यशाळा पार पडणार आहे. २५ सप्टेंबर रोजी नाट्यशास्त्र या विषयावर वक्ते पराग घोंगे, २६ सप्टेंबर रोजी चतुर्विध अभिनय या विषयावर वक्ते प्रसाद भिडे, २७ सप्टेंबर रोजी २०२४ मध्ये नाट्यशास्त्र ग्रंथाची आताच्या काळातील गरज आणि २८ आणि २९ सेप्टेंबर रोजी रस आणि भाव या विषयावर वक्त्या संध्या रायते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सहभाग शुल्क १००० रुपये आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd0v-2C-7CgeqfBFr54902JVTeX7J1USyFakuRj2q_h6vTMw/viewform?usp=sf_link हा गूगल फॉर्म भरावा आणि अधिक माहितीसाठी ८६६९९१२७०३ आणि ७६२०५६५२३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.