महाराष्ट्राला ११ हजार २०० कोटींचे प्रकल्प भेट, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
29-Sep-2024
Total Views |
पुणे : व्हिडिओ काँन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित करताना महाराष्ट्र राज्यासाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी महाराष्ट्राला ११ हजार २०० कोटी रूपयांचे प्रकल्प भेट दिले. त्यांनी २९ सप्टेंबर रोजी याबाबत घोषणा केली आहे. तसेच पंतप्रधानांचा पुणे येथे दौरा होता. मात्र अतिवृष्टीमुळे दौरा रद्द केल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे येथे पोहोचता न आल्याने दिलगीरी व्यक्त केली आहे.
व्हि़डिओ काँन्फरन्सवेळी कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी देशाच्या हिताच्या बाबींवर भाष्य केले. ते म्हणाले की, भारत देश हा मुलभूत मुल्यांच्या अधारावर अधुनिक व्हावा, परंतु आपल्या मुलभूत मूल्यांच्या आधारावर भारताने आपला वारसा अभिमानाने घेऊन पुढे जावे आणि विकास करावा असे ते म्हणाले.
यावेळी महाराष्ट्रातील विकास कामांसाठी शुभेच्छा देत असताना म्हणाले की, विठ्ठलभक्तांना एक प्रकारे ही आपुलकीची देणगी देण्यात आल्याचे सांगितले. यावेळी सोलापूरला थेट हवाई सुविधा जोडण्याचे काम पूर्ण झाले. यावेळी त्यांनी मोठ्या प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या पायाभरणीसाठी पुण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र अतिवृष्टीमुळे त्यांना पुणे शहरात येता आले नाही. आता पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावर मेट्रो सुरू होणार असल्याचे त्यांनी व्हिडिओ काँन्फरन्सद्वारे सांगितले.