पाकिस्तानात हिंदू अल्पवयीन तरूणीचे अपहरणानंतर धर्मांतरण करत जबरदस्ती निकाह

    14-Sep-2024
Total Views | 27

Conversion
 
इस्लामाबाद : पाकिस्तानातील एका हिंदू अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतरण (Conversion) करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. घडलेल्या घटनेची माहिती पीडितेच्या आई-वडिलांना मिळाली आणि ते धर्मांतरण होण्यापासून वाचवायला निघाले होते. त्यावेळी त्यांना मशीदीत येण्यास मज्जाव केला. ही घटना १२ सप्टेंबर रोजी सिंध प्रांतात घडली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील असून येथील हंगरू गावात बुधवारी १ सप्टेंर रोजी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. तसेच तिचा पाकिस्तानी कट्टरपंथींसोबत निकाह करण्यास आणि धर्मांतरण करण्यास जबरदस्ती केल्याचा प्रकार घडला. प्रशासकीय स्तरावर पीडितेचे म्हणणे ऐकून न घेतल्याने त्यांनी स्वत:हून चौकशी सुरू केली होती. यावेळी त्यांना धक्कादायक बाब समजली असता त्यांच्या पायाखालील जमीन सरकली.
 
गुरूवारी १२ सप्टेंबर रोजी पीडितेचे मदरशात धर्मांतरण कारण्यात येणार असल्याचे कुटुंबियांना समजले. मुलीच्या कुटुंबीयांनी कसाबसा मदरशात जाऊन कानाकोपरा शोधून काढला आणि आपल्या मुलांना वाचवण्यासाठी तिथे पोहोचले, पण त्यांना त्यांच्या मुलीला भेटू दिले गेले नाही. मौलवींनी पीडितेच्या कुटुंबीयांचा पाठलाग केला. यासह मुलीने इस्लाम धर्म स्वीकारला.
 
पाकिस्तानातील इत्तेहाद संघटनेचे प्रमुख शिवा फकीर काची यांनी आरोप केला की, हिंदू मुलींसोबत अशा गंभीर घटना सामान्य झाल्या आहेत. हिंदूंची लोकसंख्या अल्पसंख्याक असल्याने त्यांना हलक्यात घेतले आहे. बुधवारी १ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथून सत्र न्यायालयाने एका हिंदू मुलीला तिच्या कुटुंबीयांसोबत एकत्र राहण्याचे आदेश दिले होते. तिला २०२३ या वर्षात अपहरण करून तिच्यावर धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केली गेली. तसेच तिचे आपल्या वयाहून मोठ्या असणाऱ्या कट्टरपंथी पुरूषाशी निकाह करण्यास भाग पाडले.
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ‘फेक नरेटिव्ह’ - कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण; भाजप नेत्यांनी केली उबाठा-मनसे मोर्चामागील ‘राजकारणा’ची पोलखोल

हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ‘फेक नरेटिव्ह’ - कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण; भाजप नेत्यांनी केली उबाठा-मनसे मोर्चामागील ‘राजकारणा’ची पोलखोल

“हिंदी सक्तीच्या मुद्दयावरून राज्यात फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, यासंदर्भातील वस्तुस्थिती जनमानसात आता पोहचत आहे. कारण कोणतीच बाब लपलेली नाही, कागदावरील सर्व बाबी उघड होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातच त्रिभाषा धोरणाच्या पद्धतीला मान्यता देण्यात आली होती. उलट तेव्हा असलेला ‘अनिवार्य’ हा शब्द हटवून हिंदीची सक्ती या सरकारने काढून टाकली आहे. त्यामुळे खरेतर फडणवीस सरकारचे ठाकरेंनी अभिनंदन केले पाहिजे”, असा टोला भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121