राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ

    27-Aug-2024
Total Views |
 

natya spardha
 
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य प्रवेशिका सादर करण्यासाठी ५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण नवरे यांनी दिली आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य या वर्गवारीसाठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख २६ ऑगस्ट होती. मात्र काही नाट्यसंस्था व संघटनांनी या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. जास्तीत जास्त संघांना या स्पर्धेत भाग घेता यावा यासाठी, प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करून सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांची ही मागणी मान्य करून प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी सूचना सांस्कृतिक कार्य संचालनालयास केली. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नाट्यसंस्था आणि संघटनांनी ५ सप्टेंबर पर्यंत महानाट्यस्पर्धेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा.