कोल्हापूर : स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. भारतीय रेल्वेमध्ये२०१५मध्ये स्वप्नील मध्य रेल्वेच्या पुणे विभागात कमर्शियल कम तिकीट लिपिक म्हणून रुजू झाला. त्याने २०२३मध्ये चीन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा, वर्ष२०२२मध्ये बाकू येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले आहे. वर्ष २०१५ ते २०२३ या कालावधीत विविध नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये रौप्य आणि कांस्य पदके जिंकली आहेत.
भारतीय रेल्वेने नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे आणि त्यांना सरावासाठी लवचिक कामाच्या तासांसह मजबूत आणि अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वप्नील कुसळेच्या यशाबद्दल भारतीय रेल्वेला खूप अभिमान आहे आणि या ऐतिहासिक टप्प्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्यांच्या समर्पण आणि मेहनतीमुळे भारतीय रेल्वे आणि देशाला मोठा सन्मान मिळाला आहे,अशी भावना भारतीय रेल्वेने व्यक्त केली.