कल्याणमध्ये धोकादायक इमारतीचा भाग चाळीवर कोसळला

दोन महिला जखमी

    08-Jul-2024
Total Views |

कल्याण
 
कल्याण : शहराच्या पश्चिमेतील जोशी बाग परिसरातील आझाद नगरातील एक मजली विक्टर मोटरीचा धोकादायक इमारतीचा काही भाग शेजारी असलेल्या जुलेखा चाळीवर कोसळला. या घटनेत चाळीतील घरातील दोन महिला जखमी झाल्या आहेत. हसरत गुलाम हुसेन (८०) आणि नर्सिग शेख (२९ ) अशी या जखमी महिलांची नावे आहेत.
 
घटना प्रसंगी दोन्ही महिला घरात झोपलेल्या होत्या. माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिका, पोलिस आणि अग्नीशमन दल त्याठिकाणी दाखल झाले. ही घटना ४.३० वाजता घडली. ज्या चाळीवर धोकादायक इमारतीचा भाग कोसळला त्या चाळीतील सहा नागरीकांना महापालिकेने घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.