उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचीच पाद्यपूजा करायला हवी!

    26-Jul-2024
Total Views | 119
 
Thackeray
 
मुंबई : उद्धव ठाकरेंनी शंकराचार्यांऐवजी राज ठाकरेंचीच पाद्यपूजा करायला हवी, अशी खोचक टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे मातोश्रीवर आदरातिथ्य करत त्यांची पाद्यपूजा केली होती. यावरून आता प्रकाश महाजनांनी त्यांच्यावर टीका केली. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
 
हे वाचलंत का? -  "लाडक्या बहिणींनो सावत्र भावांपासून सावध रहा!"
 
प्रकाश महाजन म्हणाले की, "सावरकर सदन समोर असल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव असेल. ते प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहेत. त्यामुळे त्यांचाही प्रभाव असेल. खरंतर प्रबोधनकार ठाकरेंच्या दुसऱ्या नातवाने एका ढोंगी आणि तो खरा शंकराचार्य आहे की, नाही यावर सुप्रीम कोर्टात वाद सुरु आहे, त्याची पाद्यपूजा केली. खरं म्हणजे उद्धवजींनी आपल्या आधूनिक विचारांच्या भावाचीच (राज ठाकरे) पाद्यपूजा करायला हवी," असे ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121