पूजा खेडकर फरार? फोनही बंद...

    24-Jul-2024
Total Views |
 
Pooja Khedkar
 
पुणे : सध्या राज्यभर चर्चेत असलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना मसूरीतील प्रशिक्षण केंद्रात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. परंतू, त्या तिथे हजर न झाल्याने त्या फरार असल्याचे बोलले जात आहे. शिवाय त्यांचा फोनही बंद येत आहे.
 
पूजा खेडकर यांच्यावरील वाढत्या आरोपांमुळे त्यांचे महाराष्ट्रातील प्रशिक्षण स्थगित करण्यात आले होते. तसेच राज्य सरकारने त्यांना मसूरीतील प्रशासकीय अकादमीला रिपोर्ट करण्याच्या सुचना दिल्या होत्या. पंरतू, त्या तिथे हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  मनोरमा आणि दिलीप खेडकर यांचा घटस्फोट? चौकशी होणार
 
याशिवाय पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला होत्या. याप्रकरणाचा जबाब नोंदवण्यासाठीही पूजा यांना दोनदा समन्स बजावण्यात आले होते. परंतू, त्या तिथेही हजर झाल्या नाहीत. त्यामुळे आता त्या नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात येत आहे.