'संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान'चा स्मरणिका प्रकाशन आणि गुणीजन कौतुक सोहळा

    11-Jul-2024
Total Views |

Sanskruti Samvardhan Praishthan

मुंबई (विशेष प्रतिनिधी)
: 'संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान'चा (Sanskruti Samvardhan Pratishthan) स्मरणिका प्रकाशन आणि गुणीजन कौतुक सोहळा शनिवार, २० जुलै सायंकाळी ४.३० वा. बी.एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय संकुल, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण, उद्योजक एवं समाजशिल्पी जयकुमार गुप्ता, पितांबरी उद्योग समुह अध्यक्ष रविंद्र प्रभुदेसाई, विश्व हिंदू परिषद क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांची उपस्थितीत असेल. कार्यक्रमाच्या प्रारंभी सादर होणाऱ्या 'गुरु' संकल्पनेवर आधारित नृत्यनाटिकेचा आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.