ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. जॉनसिंघ यांचे निधन

    07-Jun-2024
Total Views |

AJT johnsingh
मुंबई (विशेष प्रतिनिधी): तामिळनाडूतील ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. ए. जे. टी. जॉनसिंघ यांचे शुक्रवार दि. ६ जून रोजी निधन झाले. बेंगलोरमध्ये त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेल्या जॉनसिंघ यांच्या पश्चात माईक आणि मेरविन हे त्यांचे नातू आहेत.
डॉ. ए. जे. टी. जॉनसिंघ म्हणजेच असीर जवाहर थॉमस जॉनसिंघ हे भारतातील तमिळनाडूचे पर्यावरण शास्त्रज्ञ होते. त्यांनी रानकुत्रे, आशियाई हत्ती, आशियाई सिंह, निलगिरी थार, अस्वल अशा विविध प्राण्यांसाठी त्यांनी काम केले आहे. बांदिपूर राष्ट्रीय उद्यानातील रानकुत्र्यांवर केला गेलेला अभ्यास हा भारतीय शास्त्रज्ञाने केलेला पहिला अभ्यास डॉ. जॉनसिंघ यांनी केला होता. त्यांचा जन्म नागरकोइल येथे झाला आणि ते पर्यावरण आणि वन मंत्रालयाचे सल्लागार होते . त्यांनी वन्यजीव संवर्धनावर अनेक पुस्तके लिहिली. डॉ. ए. जे. टी. जॉनसिंघ यांना पद्मश्री पुरस्काराबरोबरच इतर प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.