आंध्र प्रदेशात 'अबकी बार NDA सरकार'; जगनमोहन रेड्डीचा पक्ष पिछाडीवर

    04-Jun-2024
Total Views |
 andhra pradesh
 
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास सुरूवात झाली आहे. लोकसभा निवडणूकीत अनपेक्षितरित्या दोन्ही आघाड्यांमध्ये तगडी लढत आहे. भाजपप्रणित एनडीए आघाडीने आतापर्यंत २९५ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर इंडी आघाडीने सुद्धा २२८ जागांवर आघाडी मिळवली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जरी एनडीए आघाडीला अपेक्षित असा मिळत नसला तरी, आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत एनडीएसाठी एक आनंदाची बातमी आहे.
 
आंध्र प्रदेशात एनडीए सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे. राज्यातील १७५ पैकी १४६ जागांचे सुरुवातीलचे कल उघड झाले आहेत. सुरुवातीलच्या कलानुसार एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. येथे टीडीपी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे, तर वायएसआरसीपी मागे पडला आहे. आंध्रमध्ये चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी १०९ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप चार जागांवर पुढे आहे. सत्ताधारी वायएसआरसीपी फक्त १८ जागांवर आघाडीवर आहे.