शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार! खुद्द पवारांनीच केला दावा

    08-May-2024
Total Views |
 
Sharad Pawar
 
मुंबई : निवडणूकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
 
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, "येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होतील. काँग्रेस आणि आमच्यामध्ये मला काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या, आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. परंतू, कोणताही निर्णय हा सामूहिकपणे घेतला जाईल," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "काँग्रेस आणि दहशतवाद्यांचा ये रिश्ता क्या कहलाता है?"
 
यावेळी त्यांनी उबाठा गट आणि उद्धव ठाकरेंवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरेदेखील समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबद्दल सकारात्मक आहेत. त्यांची विचारसरणी आमच्यासारखीच आहे," असे ते म्हणाले. दरम्यान, शरद पवार गट आणि उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा सवाल सर्वत्र उपस्थित करण्यात येत आहे.