विशेष शेअर बाजार सत्र विश्लेषण व पुढील आठवड्याचा आढावा जाणून घ्या..

आज सेन्सेक्स ८८.९१ व निफ्टी ३५.९० अंशाने वाढला

    18-May-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: अनेक अडथळ्यांनी व सुट्यांनी शेअर बाजार बंद असते त्याची रिकव्हरी करण्यासाठी शेअर बाजाराचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. आज शनिवारी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स ८८.९१ अंशाने वाढत ७४००५.९४ पातळीवर पोहोचले आहे तर एनएसई निफ्टी ५० मध्ये आज ३५.९० अंशाने वाढत २२५०२.०० पातळीवर पोहोचले आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ५९.२६ अंशाने वाढत ५५०६३ पातळीवर व निफ्टी बँक निर्देशांक ८३.८५ अंशाने वाढत ४८१९९.५० पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसईत आज मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४८ व ०.७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.५१ टक्क्यांनी व ०.८२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सगळ्याच निर्देशांकात वाढ होऊन 'रिकव्हरी' झाली आहे. सर्वाधिक वाढ मिडिया (१.२४%) समभागात झाली असून रियल्टी (०.७८%), मिड स्मॉल हेल्थकेअर (०.७९%), पीएसयु बँक (०.६७%), मेटल (०.५३%) वाढ झाली आहे.
 
बीएसईत आज नेस्ले, पॉवर ग्रीड, टाटा मोटर्स, टीसीएस, एचसीएलटेक एचयुएल, लार्सन, एसबीआय, विप्रो, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, एक्सिस बँक, इंडसइंड बँक, एशियन पेंटस, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, सनफार्मा, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचडीएफसी बँक या समभागात वाढ झाली आहे तर जेएसडब्लू स्टील,अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्रा, रिलायन्स, आयटीसी या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत आज नेस्ले, पॉवर ग्रीड, हिंदाल्को, ओएनजीसी, डिवीज, टीसीएस, ग्रासीम, हिरो मोटोकॉर्प, लार्सन, एसबीआय, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, अदानी पोर्टस, विप्रो, टाटा स्टील, एचयुएल, भारती एअरटेल, एशियन पेंटस, एनटीपीसी, डॉ रेड्डीज, एक्सिस बँक, ब्रिटानिया, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एचडीएफसी लाईफ, बीपीसीएल, टायटन कंपनी,अपोलो हॉस्पिटल, कोटक महिंद्रा, टेक महिंद्रा या समभागात फायदा झाला आहे तर जेएसडब्लू स्टील, मारूती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, आयशर मोटर्स, एचडीएफसी लाईफ, कोल इंडिया, रिलायन्स, इन्फोसिस, श्रीराम फायनान्स, अदानी एंटरप्राईज या समभागात घसरण झाली आहे.
 
आज बाजारातील वातावरण सकारात्मक असल्याने विशेष सत्रात आज वाढ झाली आहे. आज विशेषतः वीआयएक्स निर्देशांकात (VIX Volatility Index) ३ टक्क्यांनी वाढ झाली होती. आज बीएसईत लार्जकॅप निर्देशांकात ज्या समभागात वाढ झाली त्या समभागात ५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे तर एनएसईत वाढ झालेल्या समभागात २.२३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे शेअर्समध्ये चढउतार झाली तरी अखेर समभाग वरच्या बाजूला झुकले आहेत.अमेरिकन बाजारातील महागाई कमी झाल्याने व भारतातील कंपन्याचे तिमाही निकाल आशादायी ठरल्याने बाजारात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारतीय निवडणूकीचा शेवटचा टप्पा जवळ आल्याने भारतीय बाजारात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
 
बीएसईतील आज एकूण ३६१३ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २४४० समभाग वधारले असून १०३७ समभागात घसरण झाली आहे तर एनएसईतील एकूण २५०८ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १७२० समभाग वधारले असून ६९५ समभागात घसरण झाली आहे.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना रेलिगेअर ब्रोकिंगचे एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा म्हणाले,'बेंचमार्क निर्देशांकांनी एक कंटाळवाणा विशेष ट्रेडिंग सत्र अनुभवले परंतु किरकोळ वाढीसह समाप्त करण्यात यशस्वी झाले. सुरुवातीच्या वाढीनंतर, निफ्टीने एका अरुंद श्रेणीत व्यवहार केला आणि अखेरीस २२५०२ वर बंद झाला. क्षेत्रीय कामगिरी संमिश्र होती, व्यापाऱ्यांना गुंतवून ठेवत, रिॲल्टी आणि फार्मा क्षेत्रांनी माफक नफा मिळवला, तर बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रे दबली. दरम्यान, मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.४% आणि ०.०८ % च्या दरम्यान वाढल्यामुळे, व्यापक बाजाराने तेजी दाखवली.
 
जरी प्रमुख समभागांमधील संमिश्र कामगिरी निर्देशांकातील गती मर्यादित करत असली तरी, बाजाराची व्यापक ताकद आणि निवडक हेवीवेट्समधील नफा भरपूर संधी उपलब्ध करून देत आहेत. सहभागींनी त्यानुसार त्यांची स्थिती समायोजित करावी आणि "बाय ऑन डिप्स" धोरण राखले पाहिजे.'
 
पुढील आठवड्याचा आढावा -
 
पुढील आठवडा कसा असेल त्यावर ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, ' मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारातील तेजीमुळे जवळजवळ ११०० अंकाची तेजी आपण पाहिली. निफ्टीने ही अशीच तेजी अनुभवली.त्यात डिफेन्स, टेक्नॉलॉजी, बॅक,ऑटोमोबाईल,टेलिकॉम वगैरे शेअर्स तेजीत होते. सुदैवाने अमेरिकेतील Consumer price index थोडाफार ठिकठाक आलाय. त्यानंतर विदेशी संस्थांमार्फत विक्री थोडी कमी झाली व आजतर नेट खरेदी १६१६ रुपयाची त्यांच्याकडून करण्यात आली.
 
अमेरिकन व्याज दरात कपातीचे संकेत बाजाराला आहेत. फेड रिझर्व ने 2024 मधे तीन वेळा व्याजदर कपात करण्याचे घोषित केले आहे.त्याकरीता वातावरण निर्मिती आवश्यक आहे. महागाई निर्देशांक,सीपीआय, यावर कंट्रोल आल्यास जुलै ते सप्टेंबर या सभामधून व्याजदर कपात होऊ शकेल असे वाटतेय. अमेरिकेतील बाॅड मार्केट स्टेबल होत आहे.ते सुद्धा आपल्या साठी खुप महत्वाचे आहे. रशिया युकरेन युद्ध आजही चालु आहे. परंतु रशियाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे तसेच अमेरिकेला डिफेन्स ऑर्डर पुढील २५ वर्षे पुरतील एवढया मिळाल्या आहेत. आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने व्याजदर कपात ही आवश्‍यक बाब ही आहेच. तसेच अमेरिकेवरील कर्ज व कर्जावरील वाढते व्याज हादेखील निवडणूकीतील एक मुद्दा आहे.
 
त्यामुळेच नोव्हेंबर मधे होणारी निवडणूकी नजरेसमोर ठेऊन आर्थिक घडी व्यवस्थित करणे जरुरी आहे. अमेरिकेत व्याज दरात कपात झाल्यास आपल्या कडील विदेशी संस्थांमार्फत गुंतवणूक वाढेल, तसेच गुंतवणूकीचे वातावरण सकारात्मक होत राहील. एकेका म्युच्युअल फंडात एका आठवड्यात १५००० ते १६००० कोटी गुंतवणूक येत राहतील व भारतीय बाजार भक्कम होत राहील. म्हणजेच पुढील नवीन सरकार अपेक्षेप्रमाणेच असेल. आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुधारत आहे या सगळीकडे बाजार लक्ष ठेऊन आहे. पुढील आठवडा बाजारात सुधारणा होत राहील असे दिसत आहे.