"पक्ष कमजोर झाला की, पवार काँग्रेसमध्ये जातात!"

    11-May-2024
Total Views |

Sharad Pawar 
 
पुणे : आपला पक्ष कमोर झाला की, शरद पवार काँग्रेसमध्ये जातात त्यानंतर तिकडे परिस्थिती नीट झाली की, परत बाहेर पडतात, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मोदीजींनी ऑफर नाही तर सल्ला दिला आहे, असेही ते म्हणाले. ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेत आणि शरद पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत यावं, असं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मोदीजींची शरद पवारांना ऑफर नाही तर तो सल्ला आहे. काँग्रेस ही डूबती नाव आहे. आधीच तुम्ही डुबला आहात आणि आणखी तुम्ही तिकडे जात आहात, असा त्याचा अर्थ होतो. पवार साहेबांची राजकीय कारकीर्द बघितल्यास ज्यावेळी त्यांचा पक्ष कमजोर झाला त्यावेळी ते काँग्रेसमध्ये गेले. तिथे जाऊन त्यांनी आपली परिस्थिती नीट केली आणि पुन्हा ते काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यामुळे पवार साहेबांनी असं वक्तव्य करणं हे ज्यांना इतिहास माहिती आहे त्यांना समजतं," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा! आनंद आश्रमालाही देणार भेट
 
ते पुढे म्हणाले की, "आम्ही घर वगैरे फोडणारे नाहीत. फॅमिली फर्स्टमुळे शिवसेनेवर ही परिस्थिती आली. तर फर्स्ट फॅमिली फर्स्टमुळे राष्ट्रवादीवर ही परिस्थिती आली आहे. अजितदादांनी पवार साहेबांसोबत हा पक्ष उभा केला. जमिनीवर पक्ष उभा करताना अजितदादांनी श्रम घेतले आणि त्यांना मान्यताही होती. पण त्यांना सातत्याने डावललं गेलं. प्रत्येकवेळी त्यांना समोर करायचं आणि नंतर तोंडघशी पाडायचं असं सुरु झालं. त्यामुळे अजितदादांनी आपल्या अस्तित्वाची लढाई केली," असेही ते म्हणाले.