आगीचा भडका! फायर रोबो तात्काळ विझवणार आग

अग्निशमन सेवा सप्ताह निमित्ताने जनजागृती मोहिमेचे आयोजन

    20-Apr-2024
Total Views | 29

fire robo


मुंबई, दि.२० :
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ९ व पोलीस चौकीजवळ असणाऱ्या जागेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाद्वारे विशेष जनजागृती प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला नागरिकांचा व विशेष करून लहानग्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याच प्रदर्शनात असणारा आग विझवणारा 'फायर रोबो' हा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला, असे मुंबई अग्निशमन दलातर्फे कळविण्यात आले आहे.

अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने मुंबई अग्निशमन दलाबाबत नागरिकांना प्रत्यक्ष माहिती व्हावी आणि अग्निशमन दलात असणारे अत्याधुनिक उपकरणे जवळून बघता यावे, या सकारात्मक हेतूने मुंबई अग्निशमनदलातर्फे विविध ठिकाणी विशेष जनजागृती प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात फायर रोबोसह वॉटर मिस्ट, व्हिक्टिम लोकेशन कॅमेरा, रेस्क्यू ट्रायपॉड स्टॅन्ड, कॉम्बिनेशन टूल यासारखी अत्याधुनिक व महत्त्वाची उपकरणे ठेवण्यात आली. त्याचबरोबर मुंबई अग्निशमन दलाचा इतिहास आणि कर्तव्ये याबाबत देखील माहितीपूर्ण फलक या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आले.
अग्निशमन सप्ताहचे वैशिष्ट्य

दिनांक १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरात 'एस. एस. फोर्ट स्टिकीन' या बोटीमधील दारूगोळ्याच्या साठ्याने पेट घेतला. त्यानंतर उसळलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी व जवानांना वीरगती प्राप्त झाली. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी १४ एप्रिल रोजी देशभरात ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन’ पाळला जातो. तसेच दरवर्षी १४ ते २० एप्रिल यादरम्यान अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो. याच अनुषंगाने यंदा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी जनजागृती पर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121